‘या’ नेत्यामुळेच नरेंद्र मोदींचा करेक्ट कार्यक्रम होईल; मनोज जरांगेंचं मोठं विधान
Manoj Jarange Patil on PM Narendra Modi : गुन्ह्यात अडकून मला जेलमध्ये टाकायचंय; मनोज जरांगे पाटील यांचं मोठं वक्तव्य.... मनोज जरांगे पाटील सध्या बीडचा दौरा करत आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मनोज जरांगे यांनी नरेंद्र मोदी यांच्याबाबतही मोठं विधान केलं. वाचा...
संजय सरोदे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, बीड | 10 मार्च 2024 : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. सध्या बीड जिल्ह्याचा दौरा करत आहेत. यादरम्यान ते स्थानिकांशी संवाद साधत आहेत. आज बीडमध्ये बोलताना त्यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. मनोज जरांगे पाटील यांच्यावर अनेक गुन्हे दाखल होत आहेत. यावर मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केलं. बुडत्याचे पाय डोहाकडे आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मोदींचाच करेक्ट कार्यक्रम होईल. गुन्ह्यात अडकून मला जेलमध्ये टाकायचे आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?
बुडतीचे पाय डोहाकडे आहेत. देवेंद्र फडणवीस आता माझ्याबरोबर गोरगरीब मराठा समाजावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देत आहेत. माझ्यावर एवढे जळू नका, आम्ही मागतोय ते आरक्षण द्या पण तसे होत नाही. फडणवीस यांच्या वागण्यामुळे मोदींचाच करेक्ट कार्यक्रम होईल, असं म्हणत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली.
सर्व जातीतील लेकरांना न्याय मिळाला पाहिजे- जरांगे
मोफत नोकरी महोत्सवातही जरांगे पाटील यांनी भाषण केलं. मी मराठा समाजाचे काम करत आहे. मी जातीयवादी नाही.नोकरी विषयात जात आणायची नाही. हे व्यासपीठ जनतेचं आहे. शासनाच्या योजना समजून सांगण्यासाठी काही टीम तयार करा, आणि हे राज्यभर करा. यामुळे सर्व जातीतील लेकरांना न्याय मिळेल, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मश्जिदमध्ये अजान सुरू होताच जरांगे पाटील यांनी भाषण थांबवलं.
मला जातीत तोलू नका; मनोज जरांगेंचं आवाहन
मला जातीत तोलू नका, फक्त मी मराठा आरक्षण बद्दल बोलतो. जातीय द्वेष राजकारणी यांनी पसरवला आहे. आपण सावध होऊन परिवर्तन केले पाहिजे. राजकारण्याकडे दारिद्र रेषेचे कार्ड कसे काय? सर्व समाजाच्या महामंडळाना जास्तीचा निधी मिळावा म्हणून प्रयत्न केले पाहिजे. आज सत्तर कंपन्यांच्या माध्यमातून बेरोजगार यांना नोकरी मिळणार आहे. रोजगार उपलब्ध करून घ्यावा, असं मनोज जरांगे म्हणाले.
गोरगरीब मराठा समाज एकदा पण केला की तो पूर्णच करतो. तुम्हाला तुमचा पण पूर्ण करायचा आहे. आम्ही देखील आमचा पण पूर्ण करू, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं. बीडच्या गेवराईत आयोजित नोकरी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मनोज जरांगे पाटील उपस्थित होते. तिथे ते बोलत होते.