विनायक मेटे यांच्या जयंतीदिनी मनोज जरांगे भावनिक; म्हणाले, मराठा आरक्षणासाठी…

Manoj Jarange Patil on Vianayak Mete : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विनायक मेटे यांच्या जयंती दिनी महत्वाचं विधान केलं आहे. मराठा आरक्षणाचा दाखला देत मनोज जरांगे पाटील यांनी विनायक मेटे यांच्या कार्यावर भाष्य केलं. मनोज जरांगे काय म्हणाले? वाचा सविस्तर...

विनायक मेटे यांच्या जयंतीदिनी मनोज जरांगे भावनिक; म्हणाले, मराठा आरक्षणासाठी...
मनोज जरांगे पाटीलImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jun 30, 2024 | 6:00 PM

शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त शिवसंग्राम पक्षाच्या वतीने बीडमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विनायक मेटे यांच्या कार्यचा उल्लेख केला. दिवंगत विनायक मेटे यांचं मराठा आरक्षणासाठी बलिदान आहे. त्यामुळे समाज कधीही विसरणार नाही. विनायक मेटेंना आम्ही अभिवादन करणार आहोत. एक मेलातरी चाललं पण एक मराठ्याच्या पोरांना आरक्षण मिळालं पाहिजे. मी वेळ आलोतर बलिदान द्यायला तयार मराठ्यांना आरक्षण देवूनच राहणार, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

दिवंगत विनायक मेटे यांचं मराठा आरक्षणासाठी बलिदान आहे. त्यामुळे समाज कधीही विसरणार नाही. त्या निवडणूक लढविणार असतील तर त्यांची ईच्छा आहे. त्यांनी का बाळगू नये. मी निवडणूक लढविणार नाही. मराठा ओबीसी समाजात अस्वस्थता नाही. छगन भुजबळ तसे भासवत आहेत. प्रकाश आंबेडकर यांचा मी सर्वात जास्त सन्मान करतो. ते खूप अभ्यासू आणि परखड बोलणारे आहेत. परखड बोलणारे मला खूप आवडतात, असंही मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

छगन भुजबळांवर पुन्हा निशाणा

13 तारखेला आरक्षण दिले नाही. तर पुढील तयारी करावे लागेल. मी लोकसभा निवडणुकीत कोणालाही नाव पाडा असं म्हटलो नाही. यावेळी मात्र नाव घ्यावे लागेल. सरकार आले तर पाच सात उपमुख्यमंत्री होतील. सर्वच जातीला मी प्राधान्य देणार नाही. मात्र मी निवडणुकीत उभा राहणार नाही. मी शब्दाला पाळतो. छगन भुजबळ शब्द पाळत नाहीत. कोणाला निवडणुकीत मदत करायची हे मी आताच सांगणार नाही. राजकारण हे गुप्त असते. आणि मला याच राजकारण्यांनी शिकविले आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

स्वातंत्र्यांनंतर ओबीसींना मिळालं आम्ही 150 वर्षापासून आरक्षण आहोत. ओबीसी नेत्यांना मात्र हे समजत नाही. आमची जमीन असताना त्या सातबारावरचं नाव खोडा असं तुमचं म्हणणं आहे. 57 लाख नोंदी मिळाल्या मराठ्याच्या त्या नोंदी रद्द करायला सांगतात मग जातीवादी कोण? आम्ही मराठा ओबीसीतूनचं आरक्षण घेणार आहोत, असं जरांगे म्हणालेत.

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...