Pharmacist Association | 45 हजार मतदारांचे पत्ते चुकीचे !! फार्मासिस्ट असोसिएशन निवडणुकीत बोगस मतदानासाठी षड्यंत्र? निवडणूक रद्द करण्याची मागणी
राज्यातील संपूर्ण आरोग्याची जबाबदारी फार्मसिस्ट यांच्यावर आहे. अनेक महत्वपूर्ण निर्णय फार्मसिस्ट घेतात ज्यामुळे नागरिकांना आरोग्य सुविधा मिळतात. अशा महत्वपूर्ण फार्मसिस्ट असोसिएशनच्या निवडणुकीत देखील सावळा गोंधळ निर्माण झाल्याने राज्यातील मतदार अवाक झाले आहेत.
11 वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच राज्य फार्मासिस्ट असोसिएशनची निवडणूक होऊ घातली आहे. सदर निवडणूकीसाठी मतदान पोस्टल बॅलेटपेपर वर होणार आहे. मात्र त्यापूर्वीच तब्बल 40 ते 45 हजार मतदारांचे पत्तेच चुकीचे असल्याने बॅलेटपेपर मतदारांना पोहोचणे अशक्य आहे. त्यामुळे सदर निवडणूक रद्द करावी आणि नव्याने मतदार यादी जाहीर करून निवडणूक घ्यावी अशी मागणी राज्यातील फार्मसिस्ट मतदारांनी केलीय. राज्यातील फार्मसिस्ट निवडणूक पुढील 21 दिवस चालणार आहे. मात्र त्यापूर्वीच एक मोठा घोळ समोर आला आहे. सदर निवडणूक पोस्टल बॅलेट पेपर च्या माध्यमातून होणार आहे. परंतु यातील एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 40 ते 45 हजार फार्मसिस्ट मतदारांचे पत्ते चुकीचे असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत गैरप्रकार होण्याची शक्यता फार्मसिस्ट मतदारांनी वर्तविली आहे. फार्मसिस्ट संघटनेने सदर निवडणूक रद्द करावी असे पत्र राज्य औषध व्यावसाय परिषदेच्या निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. पत्ते चुकीचे असल्याने या निवडणुकीत बोगस मतदान करून घेण्याचे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप उमेदवार योगेश जोशी यांनी केला आहे. राज्यातील संपूर्ण आरोग्याची जबाबदारी फार्मसिस्ट यांच्यावर आहे. अनेक महत्वपूर्ण निर्णय फार्मसिस्ट घेतात ज्यामुळे नागरिकांना आरोग्य सुविधा मिळतात. अशा महत्वपूर्ण फार्मसिस्ट असोसिएशनच्या निवडणुकीत देखील गोंधळ उडाला आहे.
35 उमेदवार रिंगणात
फार्मसिस्ट असोसिएशनच्या निवडणुकीत राज्यातून 35 उमेदवार रिंगणात आहेत. यात चार महिला उमेदवारांचाही समावेश आहे. एकूण मतदान 2 लाख 85 हजार एवढे आहे. मात्र बॅलेटपेपर वरील पत्ताच चुकीचा असल्याने राज्यातील 40 ते 45 हजार फार्मसिस्ट मतदार या निवडणुकीच्या मतदानापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मोठे षडयंत्र वापरून प्रस्थापितांना निवडून आणण्याचास घाट घातला जात असल्याचा आरोप फार्मसिस्ट संघटनेने केला आहे.
बॅलेटपेपरवर पत्ता कसा चुकला?
फार्मसिस्टचे मुख्य कार्यालय मुंबई आहे. गेल्या वीस वर्षांपासून या कार्यालयातील विविध कागदपत्रांची टपालद्वारे आदानप्रदान होतेय. कुठलेही कागदपत्रे गहाळ किंवा चुकीच्या पत्त्यावर गेली नाहीत. मात्र निवडणूक जाहीर झाल्यानंतर बॅलेटपेपर वाटपात पत्ता कसा काय चुकू शकतो असा सवाल फार्मसिस्ट मतदारांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे.
निवडणूक आयोगाकडे लक्ष
राज्यातील संपूर्ण आरोग्याची जबाबदारी फार्मसिस्ट यांच्यावर आहे. अनेक महत्वपूर्ण निर्णय फार्मसिस्ट घेतात ज्यामुळे नागरिकांना आरोग्य सुविधा मिळतात. अशा महत्वपूर्ण फार्मसिस्ट असोसिएशनच्या निवडणुकीत देखील सावळा गोंधळ निर्माण झाल्याने राज्यातील मतदार अवाक झाले आहेत. कायम अराजकीय संघटन असलेल्या फार्मसिस्ट असोसिएशनमध्ये या गोंधळामुळे मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेईल याकडे राज्यातील फार्मसिस्टचे लक्ष लागले आहे.