चालकाचा ताबा सुटला अन् बस थेट घाटात कोसळली, दैव बलवत्तवर म्हणून…
राज्य परिवहन महामंडळाची बस अंबाजोगाईहून मोरफळी येथे चालली होती. अंबाजोगाईजवळील बुट्टेनाथ घाटात बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला.
बीड / महेंद्र मुधोळकर : अंबाजोगाई येथील आगाराची अंबाजोगाई-मोरफळी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस बुट्टेनाथ घाटात पलटी झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. या अपघातात 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना 108 रुग्णवाहिकेतून दवाखान्यात दाखल करण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. दैव बलवत्तर म्हणून यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघात प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
बुट्टेनाथ घाटात चालकाचे नियंत्रण सुटले
राज्य परिवहन महामंडळाची बस अंबाजोगाई येथून येल्डा मार्गे चिचखंडी, मोरफळीला चालली होती. अंबाजोगाई लगत असलेल्या बुट्टेनाथ घाटात येताच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले अन् बस घाटात पलटी झाली. बसमध्ये 30 प्रवाशी प्रवास करत होते. बसमधील 20 ते 25 प्रवासी जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.
अपघात घडताच नागरिकांनी 108 क्रमांकला फोन केल्याने अंबाजोगाई येथील रुग्णवाहिकामधून जखमींना स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. सुदैवाने जीवितहानी न झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
नंदुरबारमध्ये बस आणि दोन ट्रकमध्ये अपघात
नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात धुळ्याहून – सुरतच्या दिशेने जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला. बस आणि दोन ट्रकमध्ये जोरदार धडक झाल्याने अपघात झाला. या अपघातात सात प्रवासी जखमी झाले. कोंडाईबारी घाटात नेहमी अपघाताच्या घटना घडतात. मात्र महामार्ग प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केली जात नाही. या महामार्गावर दिशादर्शक फलक नाही. हेच अपघाताच्या सर्वात मोठे कारण आहे. या जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.