मी जिवंत आहे तोपर्यंत…; पंकजा मुंडेंचं आवाहन काय? सर्वत्र चर्चांना उधाण
Pankaja Munde on Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे ठिकठिकाणी भेटी देत आहेत. यावेळी पंकजा मुंडे स्थानिकांशी संवाद साधत आहेत. यावेळी पंकजा मुंडे यांनी स्थानिकांना आवाहन केलं आहे. त्या काय म्हणाल्या? वाचा सविस्तर.....
बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे या महायुतीच्या उमेदवार आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यात ही लढत होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे या ठिकठिकाणी भेटी देत आहेत. दौरे करत आहेत. यावेळी पंकजा मुंडे यांचा ताफा जाणार होता. त्या ठिकाणी मराठा तरूणांनी आंदोलन केलं. पंकजा मुंडे यांनी गाडीतून उतरत त्या तरूणांशी संवाद साधला. यावर पंकजा मुंडे यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. कालच्या घोषणा माझ्याविरुद्ध नव्हत्या. तो त्यांच्या आंदोलनाचा भाग होता. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कधीही जातीवाद करणार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्यात.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
22 वर्ष मी राजकारणात ॲक्टिव्ह आहे. आजचं चित्र व्यथित करणारं आहे. सामाजिक एकोपा राखण्याच्या दृष्टीने मला चिंता वाटते. मी शांतपणे विषय हाताळला आहे. काल घोषणाबाजी झाली. मी गाडीतून खाली उतरेल अशी तरुणांना अपेक्षित नव्हतं. गोपीनाथ मुंडेसाहेब आमचं दैवत आहेत, असं तरुण ते म्हणाले. माझा मराठा आरक्षणाला कधीही तीव्र विरोध नव्हता, असं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं.
मी ओबीसी आरक्षणाचं संरक्षण केलं पाहिजे, असं मी म्हटलं होतं. या दोन्ही घटनेत मी सकारात्मक भूमिका घेतली. माझं दोन्ही समाजावर प्रेम आहे. आपुलकीचे संबंध आहेत, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
त्या आंदोलनावर पंकजा मुंडेंचं भाष्य
सोशल फॅब्रिक जीर्ण होणं हे राज्यासाठी चांगलं नाही. लोकांत प्रगल्भता होती. असा अनुभव मला कधीच आला नाही. सध्याचा आक्रोश जबाबदार आहे आणि त्या आक्रोशाला मला सामोरे जाण्याची वेळ माझ्यावर आलीय. या घटना क्रमात माझा काहीही रोल नाही. मी कोणत्याही पदावर नाही. या सर्व गोष्टींचा रोष माझ्यावर असेल तर हरकत नाही. मात्र माझ्यावर रोष नाही, असं मराठा तरुणांनी जाहीर केले आहे. मला कोणत्याही प्रतिस्पर्धी उमेदवाराबाबत काहीही बोलायचं नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. बजरंग सोनावणे यांच्याबद्दल बोलणं पंकजा मुंडे यांनी टाळलं.