धनुभाऊंसाठी पंकजा मुंडेंची सभा; म्हणाल्या, आम्ही उगीच एकमेकांच्या विरोधात…
Pankaja Munde Sabha For Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांची बीडच्या परळीत सभा घेतली आहे. या सभेत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यासाठी पंकजा मुंडे यांनी सभा घेतली. यावेळी धनुभाऊंना निवडून द्या असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भावंडांमध्ये असलेली राजकीय स्पर्धा आपण सगळ्यांनी पाहिली. अजित पवार भाजपसोबत गेले आणि त्यामुळे एकमेकांच्या विरोधात लढत असलेले मुंडे बंधू- भगिनी एकत्र आले. परळीतून धनंजय मुंडे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी भाजपच्या विधान परिषदेच्याआमदार पंकजा मुंडे यांनी सभा घेतली. यावेळी धनंजय मुंडे मंचावर असतानाच मनातील खंत बोलून दाखवली. आम्ही एकमेकांना एकमेकांच्या विरोधात खूप ऊर्जा वाया घालवली, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. तसंच धनंजय मुंडेंनी कमळाच्या चिन्हावर लढायला पाहिजे होतं, असंही त्यांनी म्हटलं.
“आम्ही उगीच एकमेकांच्या…”
आता आपल्याला धनंजय मुंडेंना आमदार करायचं आहे. आम्ही एकमेकांना एकमेकांच्या विरोधात खूप एनर्जी वाया घातली. आम्ही एक असलो असतो तर कोणालाही खेटलो असतो. या देशात अनेक परिवार एकमेव एकमेका विरुद्ध लढत आहेत. राजकारणाची पातळी अनेक जणांनी सोडली आहे. या निवडणुकीत आपण एक आहोत सर्वांना दाखवून द्यायचं आहे. सन्मानाची लढाई असते पैशाची सत्तेची नसते. कुठलीही छोटी निवडणूक सोपी समजणं हे आपल्या रक्तात नाही. आपण प्रत्येक निवडणूक जीव लावून लढवतो. फळीत निवडणूक वाटत नाही. आपणच भोंगे लाऊन तुतारीचा प्रचार करावा करावा असं वाटतं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. तुम्ही कमळ शोधणार आहात आता वाटते की धनुभाऊंनी कमळ घेतलं असत तर बरं झालं असतं… मला काहीही वाटत नाही की हा मतदारसंघ संपूर्णतः धनंजय मुंडेंकडे आहे, कारण मी तुमचे आमदार झालेले आहे, असंही त्या म्हणाल्या.
म्हणून राजकारणात आले- पंकजा
जो भाऊ एक दशकानंतर माझ्याकडे ओवाळीला आला. तो माझा भाऊ याच्या दिवाळीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. पांडव कौरवांकडे पाच गाव मागण्यासाठी गेले होते. मात्र ते दिले गेले नाहीत आणि ते गावात दिले असते तर युद्ध टळल असतं. 2009 ला पहिली आमदार होईल असं माझ्या मनात कधीही नव्हतं. मी कधीच मुंडे साहेबांचा शब्द खाली टाकला नाही. आमचं घर फुटलं आणि महाराष्ट्र बघत होता. मी कधी पाय जमिनीवर ठेवले नाहीत मात्र बाबा एकटे पडले. म्हणून मी राजकारणात आले, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
जीवनात काय चांगले काम करू शकले मला माहित नाही मात्र वाईट काम मी कधीच केले नाही. मी ज्यावेळेस लोकसभेला उभा टाकले. त्यावेळेस माझा भाऊ माझ्यासोबत आला आणि माझा प्रचार केला मला खूप चांगले वाटले. राजकारणाच्या चिखलात कमळ म्हणून तुला काम करायचे असं बाबांनी सांगितलं होतं. मी लोकसभा इच्छा नसताना लढले. लोकसभा निवडणुकीनंतर सगळे रडत होते मात्र मी रडले नाही. मी रडली त्यावेळेस पोरांनी आत्महत्या केली. माझ्या जीवनातल्या संघर्षाला तुम्ही जबाबदार नाहीत तुम्ही माझी साथ दिली, असं पंकजा मुंडे म्हणाल्यात.
आपल्याला बदला घ्यायचा नाही तर राजकारणाचा वातावरण बदलायचं आहे. साहेब असते तर हे राजकारण बघून थक्क झाले असते. आपल्याला हा विजय मिळवायचाच आहे आणि गुलाल उधळायचा आहे. .ईश्वरासमोर आणि मुंडे साहेबांना व्यतिरिक्त कुणासमोरही झुकायचे नाही, असं पंकजा म्हणाल्या. पंकजा मुंडे यांनी घड्याळाचे बटन दाबण्याचे दोनदा सांगितले,