Beed : बीडमध्ये एसटी आणि खासगी बसवर दगडफेक! रस्त्यावर टायर जाळून दगडफेकीच्या घटनेनं खळबळ
Beed Stone attack : नेमकी ही दगडफेक कोणत्या कारणासाठी करण्यात आली, याचा तपास करणं आता पोलिसांसमोरचं आव्हान आहे.
बीड : बीडमध्ये (Beed crime) खळबळजनक घटना घडली. बीडच्या गेवराईमधून (Beed Gevrai) एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. तसंच एका खासगीलाही टार्गेट करण्यात आलं. यावेळी अज्ञाक टोळक्यांनी दोन एसटी बसवर दगड भिरकावले. यात एसटी बसचा नुकसान झालं. तसंच खासगी बसचंही दगडफेकीत नुकसान झालंय. नेमकी ही दगडफेक कोणत्या कारणासाठी करण्यात आली, याचा तपास करणं आता पोलिसांसमोरचं आव्हान आहे. दोन्ही बसवर दगडफेक (Stone attack on buses in Beed) करण्याआधी अज्ञातानंनी रस्त्यावर टायर जाळला होत्या. त्यानंतर एकूण तीन बसवर दगडफेक करण्यात आली आहे. रातोरात घडलेल्या या घटनेनं अचानक कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
बीडमध्ये नेमकी कुठे घटना?
बीडच्या गेवराई शहरात दगडफेकीची ही घटना समोर आली. गेवराईतील दसरा मैदानाजवळ अज्ञातांच्या टोळक्यानं रस्त्यावर टायर जाळला. त्यानंतर बसवर दगडफेक केली. दगडफेकीत एसटी बसची समोरची काच तुटली होती. एक दोन एसटी बस आणि एक खासगी बसचं या दगडफेकीत नुकसान झालं आहे.
आठ ते नऊ जणांनी एकत्र येऊन ही दगडफेक केल्याची भीती व्यक्त केली आहे. तोंडाला स्कार्फ बांधून आलेल्या या लोकांनी दगडफेक केली. यावेळी प्रतिकात्मक अज्ञात पुतळा जाळत ट्रॅव्हल्सवर दगडफेक केल्याचं सांगितलंय जातंय. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काल पोलीस बंदोबस्तात वाढ गेली आहे.
वाहतूकदार धास्तावले
बाडचे पोलीस उपअधिक्षकांनी ही माहिती कळताच घटनास्थळी धाव घेतली. सध्या याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. दरोडा घालण्याच्या उद्देशानं ही दगडफेक करण्यात आली होती की आणखी काही कारणं होतं? हे आता चौकशीअंती समोर येईल. मात्र एकूणच या घटनेमुळे बीडमध्ये होणाऱ्या रात्रीच्या वेळी वाहतूक करणारे कमालीचे धास्तावले आहेत.