माझ्या वडिलांसोबत जे घडले ते…; मस्साजोगच्या सरपंचाच्या हत्येनंतर लेक हळहळली

Massajog Sarpach Santosh Deshmukh Death Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली. या हत्या प्रकरणाने बीड जिल्हा हादरला. संतोष देशमुख यांच्या लेकीने या हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर बातमी...

माझ्या वडिलांसोबत जे घडले ते...; मस्साजोगच्या सरपंचाच्या हत्येनंतर लेक हळहळली
संतोष देशमुख यांची लेक हळहळलीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Dec 11, 2024 | 1:32 PM

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं सोमवारी अपहरण झालं. धक्कादायक बाब म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या झाली. या घटनेने बीड जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरला. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ कालचा रस्ता रोको आंदोलन देखील करण्यात आलं. आज दुसऱ्या दिवशीही मस्साजोगच्या ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाडून या घटनेचा निषेध केला आहे. संतोष देशमुख यांच्या लेकीने या प्रकरणावर टीव्ही 9 मराठीशी बोलताना न्यायाची मागणी केली आहे. माझे वडील आदर्श व्यक्तिमत्त्व होते. त्यांची अशा पद्धतीने क्रूर हत्या व्हायला नको होती. त्यांनी कोणाचेही वाईट चिंतलं नव्हतं. त्यांना न्याय मिळाला पाहिजे, असं वैभवीने म्हटलं आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना वैभवीला अश्रू अनावर झाले.

बापाला न्याय मिळावा म्हणून लेकीची आर्त हाक

पोलिसांनी केवळ दोन आरोपींना अटक केली आहे. इतर आरोपींना देखील तात्काळ अटक करावी. आरोपींची नार्को टेस्ट करावी ही माझी प्रमुख मागणी आहे. माझ्या वडिलांसोबत जे घडले ते इतर कोणासोबतही घडू नये. त्यासाठी पोलिसांनी कारवाईची योग्य पाऊले उचलावीत, असं वैभवीने म्हटलं आहे.

 पोलिसांची भूमिका संशयास्पद- संदीप श्रीरसागर

बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील या घटनेचा निषेध केला. त्यानंतर बीडचा बिहार झाला की काय असा सवाल संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केला आहे. बीड जिल्ह्यात मोठी दहशत झाली आहे. बीडचा बिहार झाली की काय असं वाटतंय. कुठल्याही प्रकरणात पोलीस फिर्याद घेत नाहीत. उलट फिर्यादीवरच गंभीर गुन्हे दाखल करतात. वाल्मीक कराड नावाचा माणूस हा सर्व गोष्टी घडवून आणत आहे. मी विरोधी बाकावर जरी असलो तरी गप्प बसणार नाही. या बद्दल मी विधानसभा सभगृहात आवाज उठविणार आहे, असं संदीप क्षीरसागर म्हणालेत.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात संदीप क्षीरसागर यांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. शरद पवार यांचीही भेट घेवून मी बीड जिल्ह्याच्या दहशतीची माहिती त्यांच्या कानावर घालणार आहे. बीडमध्ये व्यापारी देखील दहशतीत आहेत. मी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या कारखान्यावर नोटीस काढण्यात आली. माझ्या हॉस्पिटलवर सुद्धा नोटीस काढण्यात आली. मात्र मी घाबरणार नाही. लोकांसाठी मी रस्त्यावर उतरणार आहे. बीड पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. पोलीस सध्या त्यांचे काम करतात, असा गंभीर आरोप क्षीरसागर यांनी केला आहे.

'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.
शिवसेनेतील मंत्रिपदासाठी इच्छुक अन् नाराजांसाठी एकनाथ शिंदेंचा तोडगा
शिवसेनेतील मंत्रिपदासाठी इच्छुक अन् नाराजांसाठी एकनाथ शिंदेंचा तोडगा.
'लाडक्या बहिणीं'नो डिसेंबरचा हप्ता हवाय? ही कागदपत्र तुम्ही जोडलीत का?
'लाडक्या बहिणीं'नो डिसेंबरचा हप्ता हवाय? ही कागदपत्र तुम्ही जोडलीत का?.
Bogus Medicines : बोगस गोळ्या-औषधांचा भांडाफोड, खरे मास्टरमाईंड कोण?
Bogus Medicines : बोगस गोळ्या-औषधांचा भांडाफोड, खरे मास्टरमाईंड कोण?.
पवारांवर टीका करताना पडळकर अन् खोतांची मारकडवाडीतून जहरी टीका
पवारांवर टीका करताना पडळकर अन् खोतांची मारकडवाडीतून जहरी टीका.
14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार,शिंदे-दादांच्या मंत्र्याची यादी दिल्लीत?
14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार,शिंदे-दादांच्या मंत्र्याची यादी दिल्लीत?.
बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट
बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट.
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य.
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ.
लातूर शेतकरी जमीन प्रकरणात वक्फ बोर्डाकडून मोठा खुलासा, म्हणाले...
लातूर शेतकरी जमीन प्रकरणात वक्फ बोर्डाकडून मोठा खुलासा, म्हणाले....