Beed | रस्त्याचे निकृष्ट काम, ग्रामस्थांचा संताप, जेसीबीने रस्ताच खणला, बीड जिल्ह्यातील प्रकार, कंत्राटदाराचा निषेध
मुळकवाडी ते मसेवाडी या रस्त्याचे काम ठिकठिकाणी अर्धवट राहिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे असे काम करणाऱ्या औरंगाबादच्या कंत्राटदाराचा ग्रामस्थांनी तीव्र निषेध केला आहे.
बीड | रस्त्याचे काम करण्यासाठी लाखो-कोटींचा निधी घेतला जातो. मात्र कंत्राटदार हे काम चांगल्या दर्जाचे करतोय की नाही, याकडे सरकारचे लक्षच नसते, हा अनुभव अनेकदा नागरिकांना येतो. बीड जिल्ह्यातही (Beed District) नागरिकांना असा अनुभव आला. 1 कोटी 26 लाख रुपयांचा निधी खर्च करून रस्ता बांधला आणि कंत्राटदाराने (contractor) अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करून दिले. अनेक ठिकाणी रस्त्याचे (Road Construction) काम अर्धवट ठेवले. असल्या कारभाराचा संताप अनावर झाल्याने नागरिकांनी थेट जेसीबी आणला आणि हा रस्ताच खणून काढला. बीड जिल्ह्यातील नागरिकांनी व्यक्त केलेला हा निषेध सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. शनिवारी सकाळीच ग्रामस्थांनी एकत्र येत जेसीबीच्या मदतीने येथील रस्ता खणून काढला.
नेमका कुठे घडला प्रकार?
बीड जिल्ह्यातील मुळकवाडी ते मसेवाडी या रस्त्याबाबत सदर प्रकार घडला आहे. रस्त्याचे बांधकाम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून करण्यात आले. परंतु या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा ठपका ठेवत संतापलेल्या ग्रामस्थांनी रस्ताच जेसीबीने खोदून काढला आहे. सदरील रस्ता एक कोटी 26 लाख रुपयांचा असून औरंगाबादच्या ठेकेदाराकडून याचे काम करण्यात आले. रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून ठीक ठिकाणी रस्ता अर्धवट ठेवण्यात आलाय. याची तक्रार वारंवार करून सुद्धा कोणतीच कारवाई न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी हा रस्ता जेसीबीच्या सहाय्याने खोदून ठेकेदार आणि प्रशासनाचा निषेध केला आहे.
औरंगाबादच्या ठेकेदाराविरुद्ध संताप
मुळकवाडी ते मसेवाडी या रस्त्याचे काम ठिकठिकाणी अर्धवट राहिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे असे काम करणाऱ्या औरंगाबादच्या कंत्राटदाराचा ग्रामस्थांनी तीव्र निषेध केला आहे. प्रशासनाने वेळीच या प्रकरणाची दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
इतर बातम्या-