Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीडमध्ये तरुणाचा कौतुकास्पद निर्णय, तृतीय पंथीय मुलीशी विवाह करणार, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लग्नसोहळा!

मराठवाड्यातील हा पहिला विवाह होणार आहे. तृतीय पंथीयांना समाजात मान सन्मानान देण्यात यावा. अशी भावना व्यक्त केली जातेय. त्यामुळे स्वतःहून जर असे विवाह इच्छुक असतील तर त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

बीडमध्ये तरुणाचा कौतुकास्पद निर्णय, तृतीय पंथीय मुलीशी विवाह करणार, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लग्नसोहळा!
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 10:50 AM

बीडः समाजात नेहमीच विशिष्ट प्रकारची, काहीशी नकारात्मक वागणूक मिळणाऱ्या तृतीय पंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. यासाठी आपण काही करू शकतो का, असा विचार करत बीडमधील एक तरुण पुढे आला आहे. शहरातील किन्नर सपना (Kinner Sapna)आणि बाळू (Balu) नावाचा हा तरुण लवकरच विवाहबद्ध होणार आहे. मागील अडीच वर्षांपासून या दोघांची मैत्री असून आता या दोघांनी पुढील आयुष्यातही एकमेकांची साथ द्यायची असा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसात हे दोघेही विधिवत लग्न (Beed Kinner Marriage) करणार असल्याची माहिती या दोघांनी दिली आहे.

अडीच वर्षांची मैत्री, आता लग्नात रुपांतर होणार

बाळू धुताडमल हा जागरण गोंधळात हलगी वाजवून आपला उदरनिर्वाह करतो. अशातच त्याची ओळख सपनाशी झाली. या भेटीचे रूपांतर प्रेमात झालं आणि तब्बल अडीच वर्षानंतर त्यांनी आपला संसार फुलवण्याचा निर्णय घेतलाय. रुसव्या फुगव्यातून या दोघांच्या प्रेमाची गोडी अधिक घट्ट झालीय.  समाजात आजही या घटकाला स्वीकारण्यासाठी नाकं मुरडली जातात. त्यामुळे लग्न करण्याचा पेच या जोडप्या समोर निर्माण झाला. त्यांनी पत्रकार संघाच्या आयशा शेख यांची भेट घेतली. आणि चर्चेतून मार्ग काढून अखेर विवाह जुळवण्याचा निर्णय बीडच्या पत्रकार संघाने घेतला आहे.

मराठवाड्यातला पहिलाच असा विवाह

याआधी मनमाड मध्ये किन्नर शिवलक्ष्मी आणि संजय झाल्टे हे विवाह बंधनात अडकले होते. या विवाहानंतर मराठवाड्यातील हा पहिला विवाह होणार आहे. या घटकाला देखील समाजात मान सन्मानान देण्यात यावा. अशी भावना व्यक्त केली जातेय. त्यामुळे स्वतःहून जर असे विवाह इच्छुक असतील तर त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. येत्या मार्च महिन्यात 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन आहे. या दिनाचे औचित्य साधून बाळू आणि सपना हे दोघेही लग्न करणार आहे.

इतर बातम्या-

VIDEO | ‘एका कॅबिनेट मंत्र्याच्या घरी पहाटे ईडीचे लोक येतात, घेऊन जातात…’ राऊतांची पहिली प्रतिक्रिया

सूर्यास्ताचे फोटो काढताना पाय निसटला, 14 वर्षांचा मुलगा महाबळेश्वरच्या दरीत कोसळला

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.