परळीत राजकारणाची नवी नांदी, वैद्यनाथ साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बहिणीची वर्णी

पंकजा मुंडे यांचा पराभव करण्यासाठी स्थानिक नेते पुढे आले. मात्र याचवेळी बहिणीला साथ देण्यासाठी धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे दोघेही मुंडे बहीण भाऊ या निमित्त एकत्र आले.

परळीत राजकारणाची नवी नांदी, वैद्यनाथ साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बहिणीची वर्णी
Follow us
| Updated on: Jun 19, 2023 | 5:15 PM

संभाजी मुंडे, प्रतिनिधी, बीड : परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत कराड यांची निवड झालीय. जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त मुंडे बहीण भाऊ एकत्र आले. याचीच नांदी या निवडणुकीत पाहायला मिळालीय. राजकीय वैमनस्य असणारे मुंडे बहीण -भाऊ शिक्षण संस्था आणि साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त एकत्र आले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली. पंकजा मुंडे यांचा पराभव करण्यासाठी स्थानिक नेते पुढे आले. मात्र याचवेळी बहिणीला साथ देण्यासाठी धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे दोघेही मुंडे बहीण भाऊ या निमित्त एकत्र आले.

२१ पैकी ११ सदस्य पंकजा मुंडे गटाचे

साखर कारखान्याच्या 21 जागांसाठी निवड प्रक्रिया पार पडली. यात 11 सदस्य पंकजा मुंडे तर दहा सदस्य हे धनंजय मुंडे यांचे निवडून आले. आज अध्यक्ष पदासाठी निवड झाली. यातच पंकजा मुंडे अध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी नव्या कार्यकर्त्याला संधी दिलीय.

हे सुद्धा वाचा

चंद्रकांत कराड यांची उपाध्यक्षपदी निवड

चंद्रकांत कराड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. या निवडीनंतर पंकजा मुंडे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाल्या. तर कारखान्याच्या हितासाठी आम्ही दोघांनी हा निर्णय घेतल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत या मुंडे बहीण भावाची युती दिसून आली. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा साखर कारखान्याच्या निवडणुकीत दिसून आली. आता हेच समीकरण आगामी काळात पाहायला मिळतं का हे पाहणे देखील महत्त्वाचे असणार आहे.

पुन्हा एकत्र येणार का?

11 संचालक पंकजा मुंडे तर 10 संचालक धनंजय मुंडे यांचे बिनविरोध निवडून आले. धनंजय मुंडे यांच्या कडून चंद्रकांत कराड यांच्या सारखा अतिशय नवा चेहरा देण्यात आला. आता इथून पुढे जे राजकीय वैर महाराष्ट्रने पहिला ते आगामी काळात पुन्हा हे दोघे बहीण भाऊ एकत्र येतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.