अब चलू मै अपनी चाल…; भगवान गडावरच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंची शेरोशायरी

Pankaja Munde Dasara Melava Full Speech : भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी पंकजा मुंडे यांनी धडाकेबाज भाषण केलं. या भाषणात पंकजा मुंडे यांचा शायराना अंदाज पाहायला मिळाला. त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला आणि शेवटी शायरी म्हटली. वाचा...

अब चलू मै अपनी चाल...; भगवान गडावरच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंची शेरोशायरी
पंकजा मुंडे, भाजप नेत्याImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 12, 2024 | 3:15 PM

गोपीनाथ मुंडे यांची कन्या, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा बीड जिल्ह्यातील भगवान गडावर दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याची सुरुवात आणि शेवट पंकजा मुंडे यांनी शेरोशायरीने केला. पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामागारांचे प्रश्न या दसरा मेळाव्यात मांडले. या मेळाव्याला १८ पगड जातीचे लोक आले की नाही,. नाशिकहून आले का, नगरहून आले का, बुलढाण्याहून आले का, आता कुठून कुठून आले गंगाखेड, जिंतूर परभणी नांदेड, अकोला अमरावती पुणे पिंपरी चिंचवड आले का …. सगळ्या राज्यभरातून आलेले बांधव. तुम्हाला मी दरवर्षा साष्टांग दंडवत घालते. कारण माझ्या बापाने मरताना माझ्या झोळीत तुमची जबाबदारी टाकली आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

‘मै गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ’ या शायरीने पंकजा मुंडेंनी भाषणाची सुरुवात केली.

तुम लाख कोशिश करो, हमे हराने की,

हम जबजब बिखरेंगे, दुगनी रफ्तार से निखरेंगे

इन्सान की जाती, फिर भी मुश्किल जीना जीते है

जातीभेद और पिछडेपण का नित्य जहर जो पिते है

उन पिछडोने अपनाया मुझको, मै उनकी रोजीरोटी हूँ

मै गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ

पिछडों का दर्द मैने, अपना दर्द माना है

उनका सहारा मैने मन में ठाना है

कमजोर हो जो चल ना सके

मै उनके हाथ की लाठी हूँ

मै गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ

मी गरीबांसाठी काम करणारी आहे. राजकारणाला चिटकून बसणारी नाही. पाच लेकरांनी जीव दिला. त्या आमदारकीचं काय गोड वाटणार आहे. आमदारकी खासदारकी काही नव्हती, तरीही पाच वर्ष तुम्ही आला. उद्याही याल. आपल्याकडे काही असो नसो मी तुमच्या मागे येणारच. जो वंचित आहे. ज्याची पत आणि ऐपत नाही. अशा लोकांसाठी मी राजकारणात आहे. गाड्या घेण्यासाठी नाही. टेबलाखालून पैसे घेण्यासाठी नाही. तुम्ही म्हणता म्हणून मी हेलिकॉप्टरने येते. तुम्ही म्हटला तर बैलगाडीतून येईल, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

‘अब चलू मै अपनी चाल पे’ म्हणत पंकजा मुंडे यांनी भाषणाचा समारोप केला.

“अब जो भी होगा मै देखुंगी,

जो लिखा काल के भाल पर,

कांटे हो या हो अंगारे,

अब चलू मै अपनी चाल पे

एक बहन थी माता है

अब काली बहन की लौटी हूँ

मै गौपीनाथ मुंडे की बेटी हूँ”

Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.