मै शहेनशहा, बाकी भंगार, बीडमध्ये बेधुंद बर्थ डे पार्टी!! कोरोना नियम धाब्यावर, प्रशासन जागं आहे का?
आज चार दिवस उटलल्यानंतरही कुणी जाब विचारलेला नाही, तर इकडे सोशल मीडियावर पार्टीच्या व्हिडिओंनी धुमाकूळ घातलाय. एवढे पुरावे असतानाही, कारवाई मात्र शून्य असल्याने इथलं प्रशासन जागं आहे का झोपलंय, हाच प्रश्न नागरिकांना पडलाय.
बीड: नेत्यांचा वाढदिवस धिंगाणा, तलवारीनं केक कापणं, कर्णकर्कश डीजे असा गाजावाजा झाल्याशिवाय साजरा झाला कसं म्हणायचं, अशी परंपराच बीडमध्ये जणू रुजतेय. नुकत्याच झालेल्या एका वाढदिवसात तर सर्वच मर्यादा ओलांडल्या गेल्या. हा वाढदिवस (Birthday Party) होता एका भाजप नेत्याचा (BJP Leader). मात्र बर्थडे पार्टीत उपस्थित राहणाऱ्यांची संख्या, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्क घालणे आदी सर्व नियमांचा विसर या कार्यकर्त्यांना पडलेला दिसला. नेत्यासहित कार्यकर्तेही एवढे बेधुंद होते की त्यांना कशाचेही भान उरले नाही. विशेष म्हणजे प्रशासनाकडूनही (Beed Administration) या पार्टीवर काहीही कारवाई केली गेली नाही. त्यामुळे सामान्य जनतेतून संतप्त भावना उमटत आहेत.
बीडमधील युवा कार्यकर्त्याने शेअर केलेली फेसबुक लिंक-
कोण हे बर्थ डे बॉय?
तर, हा वाढदिवस होता बीडमधील भाजप तालुकाध्यक्ष स्वप्नील गलधर यांचा. बीडच्याच लिंबागणेश गावातल्या नेत्याच्या वाढदिवसासाठी कार्यकर्त्यांनी जंगी तयारी केली. उत्साही कार्यकर्त्यांनी नेत्याला खुश करण्यासाठी पार्टी आयोजित केली. वाढदिवसासाठी डीजे लावण्यात आला. या पार्टीला जमलेल्या लोकांची संख्या शंभराहून अधिकच होते. त्यातही एकानंही मास्क घातलेला नव्हता. एवढा धांगडधिंगाणा चालला असताना प्रशासनाला कानोकार खबरही कशी गेली नाही, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मै शहेनशहा, बाकी भंगार…
मागील चार दिवसांपासून बीड आणि परिसरातील सोशल मीडियावर या भाजप नेत्याच्या वाढदिवसाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मात्र कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी कुणावरही कारवाई कशी होत नाहीये, असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. या पार्टीत मै शहेनशहा, बाकी भंगार… “अरे दिवानो मुझे पहचानो” या गीतांवर कार्यकर्त्यांसह नेता देखील थिरकला. आज चार दिवस उटलल्यानंतरही कुणी जाब विचारलेला नाही, तर इकडे सोशल मीडियावर पार्टीच्या व्हिडिओंनी धुमाकूळ घातलाय. एवढे पुरावे असतानाही, कारवाई मात्र शून्य असल्याने इथलं प्रशासन जागं आहे का झोपलंय, हाच प्रश्न नागरिकांना पडलाय.
इतर बातम्या-