मंत्रिमंडळ विस्तार, बच्चू भाऊंचा अपघात काय कनेक्शन?; सुषमा अंधारे यांचा सवाल
काही अंध भक्त आमच्यावर टीका करत आहेत. पक्ष बेकायदेशीर आहे का? आमदार आणि खासदार या संख्येवर पक्ष ठरत नाही. पक्षाला मिळालेल्या मतदानाच्या टक्केवारीवर पक्ष ठरतो.
बीड : प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी सांगितलं की, मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यानंतर त्यांचा अपघात झाला. अशावेळी अपघात कसा होतो, यावर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं पाहिजे. मंत्रिमंडळ विस्तार आणि बच्चू कडू यांचा अपघात याचा कनेक्शन काय, असा सवालही सुषमा अंधारे यांनी विचारला. बीडमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाची बैठक झाली. त्यानिमित्त बोलताना शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या, शिवसेना ही ओपन किचन आहे, जे शिजतं ते दिसतं. माझं स्वागत छान केलं. मी सगळ्याच्या ऋणात राहणे पसंत करेन. मराठवाड्यात आचारसंहिता आहे. त्यामुळे महाप्रबोधन यात्रा आणता आले नाही. समारोपाला महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित राहतील.
काही अंध भक्त आमच्यावर टीका करत आहेत. पक्ष बेकायदेशीर आहे का? आमदार आणि खासदार या संख्येवर पक्ष ठरत नाही. पक्षाला मिळालेल्या मतदानाच्या टक्केवारीवर पक्ष ठरतो. आम्ही मतांची टक्केवारी सिद्ध केली आहे. जे निवडणुकीला सामोरे गेलेच नाहीत. त्यांची टक्केवारी कुठून येईल.
सुभाष देसाई – संजय राऊत यांच्यासह आमचे नेते बेकायदेशीर असतील तर यांच्या सह्या त्या चाळीस आमदार यांच्या A B फॉर्म ला सूचक म्हणून आहेत. जे होईल ते होईल आम्ही लढणार आहोत आणि आम्ही जिंकणार आहोत, असंही सुषमा अंधारे यांनी सांगितलं.
इलाका तुम्हारा धमाका हमारा
इलाका तुम्हारा धमाका हमारा, ही आमची स्टाईल आहे. शिंदे गट कॉप्या करून पास झाले आहे. येणाऱ्या काळात सर्वच निवडणुका लढणार आहोत. कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
सत्यजित तांबे यांनी कोणती कामे चांगली केली?
महाविकास आघाडीने काही जागा वाट्याला दिल्या होत्या. मात्र काँग्रेसमधून अडचण झाली. त्यांनी सल्लामसलत करायला हवे होते. भाजप हे सर्व ठरवून करत आहे. सत्यजित तांबे यांनी कोणतं कार्य चांगलं केलं? मोदींच्या पोस्टरला काळ फासलं त्याचं किताब म्हणून भाजपने मदत केली, अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी केली.
माझ्यावर आरोप करणारे वारकरी नव्हे
नरेंद्र मोदी यांना देवेंद्र फडणवीस अडचणीत आणत आहेत. काँग्रेस गाफील आहे की नाही हे काँग्रेसला विचारले पाहिजे. माझ्यावर आरोप करणारे वारकरी नव्हते, ते मोहन भागवत यांचे धारकरी होते. 13 वर्षापूर्वीचे माझे व्हिडीओ काढले. भाजपमधल्या बायकांना नको त्या विषयावर चर्चा करण्याची सवय लागली आहे. चित्रा वाघ यांच्यावर सुषमा अंधारे यांनी टीका केली.
त्यांना पद्धतशीर बाजूला केले जात आहे
अमृता फडणवीस आणि केतकी यांनी काय कपडे घालावे हे त्यांचे चॉईस आहे. पंकजा ह्या लोकनेत्या आहेत. टीम देवेंद्र त्यांना पद्धतशीरपणे साईडला घेत आहेत. पंकजा यांनी स्वतंत्र विचार करायला हवे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.