शंकरपाळ्या आणि कारल्यानंतर आता राज्यभर गाजतंय ‘या’ दोघांचं भांडण, Beedमधला Video viral
शंकरपाळ्या आणि कारल्या या दोघांचे भांडण अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आणि अखेर ते मिटवले देखील, आता 'या' दोघांच्या भांडणानंतर असाच एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियात (Social media) धुमाकूळ घालत आहेत. हा व्हिडिओ बीड (Beed) जिल्ह्यातील शिरसाळा या ठिकाणचा असल्याचे समोर आले.
![शंकरपाळ्या आणि कारल्यानंतर आता राज्यभर गाजतंय 'या' दोघांचं भांडण, Beedमधला Video viral शंकरपाळ्या आणि कारल्यानंतर आता राज्यभर गाजतंय 'या' दोघांचं भांडण, Beedमधला Video viral](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/03/21235137/boys-funny.jpg?w=1280)
परळी (बीड) : शंकरपाळ्या आणि कारल्या या दोघांचे भांडण अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आणि अखेर ते मिटवले देखील, आता ‘या’ दोघांच्या भांडणानंतर असाच एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियात (Social media) धुमाकूळ घालत आहेत. हा व्हिडिओ हाती आल्यानंतर त्याचा शोध आम्ही घेतला. महाराष्ट्रभर याची चाचपणी झाली आणि अखेर हा व्हिडिओ बीड (Beed) जिल्ह्यातील शिरसाळा या ठिकाणचा असल्याचे समोर आले. त्या गावात जाऊन या तिघांचे भांडण नेमके कोणत्या कारणाने झाले, हे आम्ही जाणून घेतले. श्रेयस मिरगे आणि आयूष मिरगे अशी या दोघांची नावे… दरम्यान, ग्रामस्थांच्या मदतीने या तिघांचा वाद मिटवण्यात आला आहे. मात्र मस्करीत केलेला व्हिडिओ एवढा व्हायरल होईल, असे वाटले नाही, अशी प्रतिक्रिया गावकरी देत आहेत. दोघे भांडत आहेत आणि त्यांचे इतर मित्र त्यांची समजूत काढत आहे.
रस्त्यातच कल्ला
श्रेयस मिरगे आणि आयूष मिरगे नात्याने हे दोघेही सख्खे चुलत भाऊ. तर यश कानडे हा त्यांचा आतेभाऊ, दुकानातून सुपारी घेऊन आल्यानंतर श्रेयस घरी निघाला होता. मात्र यादरम्यान आयूष आणि यश या दोघांनी त्याला रस्त्यातच गाठून हा कल्ला सुरू केला आणि आता शंकरपाळ्या आणि कारल्या या दोघांप्रमाणेच हा व्हिडिओ अवघ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे. बच्चेकंपनीचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
शंकरपाळ्या आणि कारल्यानंतर आता राज्यभर गाजतंय ‘या’ दोघांचं भांडण, Beedमधला Video viral#beed #funny #childrens #VideoViral #Trending #viral #SocialMedia #shorts अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/EXaQRywSvh pic.twitter.com/Geq5fNFjTZ
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 21, 2022
शंकरपाळ्या आणि कारल्याचा व्हिडिओही झाला होता व्हायरल
शंकर आणि कार्तिक नावाचे मित्र खेळता खेळता अचानक भांडायला लागले. भांडता भांडता त्यांनी एकमेकांना नावावरून चीड पाडली. त्यातील कार्तिकने शंकरला ‘अय.. शंकरपाळ्या’ म्हणून चिडवलं. मग काय शंकरने फिल्मी स्टाईलमध्ये त्याला दम दिला आणि उपस्थित असलेल्या कुणीतरी तो व्हिडिओ काढून फेसबुक शेअर केला. मागच्या वर्षी हा व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला.