जीवघेण्या स्पर्धा | पोलिसांच्या नाकावर टिच्चून बीडमध्ये रंगली रेड्यांची चित्तथरारक झुंज; एक रेडा जखमी
रामनवमीनिमित्त बीडच्या वायबट्टवाडी गावात ग्रामस्थांनी या टक्करींचे आयोजन केले होते. संपूर्ण राज्यभरातून रेडे या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आणले गेले होते.
बीडः प्राण्यांच्या झुंज (Collision of animals) आणि टक्करीसारख्या जीवघेण्या स्पर्धेवर राज्यात बंदी आहे. मात्र बीडमध्ये मोठ्या जल्लोषात रेड्यांच्या टक्करीचे थाटामाटात आयोजन करण्यात आले होते. रामनवमीनिमित्त बीडच्या (Beed) वायबट्टवाडी (Waybattwadi) गावात ग्रामस्थांनी या टक्करींचे आयोजन केले होते. संपूर्ण राज्यभरातून रेडे या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आणले गेले होते. मागील काही दिवसांपूर्वी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातही बैलांच्या टक्करींचे आयोजन केले गेले होते, त्यावेळीही सिंधुदुर्ग पोलिसात आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला गेला होता. कोकणातील झुंज लावण्यात आल्यानंतर याप्रकरणात त्यामध्ये जखमी होऊन एका बैलाचा मृत्यू झाला होता.
काल दिवसभर चाललेल्या या स्पर्धेत अनेक रेडे जखमीदेखील झाले आहेत. अशा जीवघेण्या कार्यक्रमाला बंदी असतानादेखील बीडमध्ये मात्र मोठ्या उत्साहात ही स्पर्धा पार पाडण्यात आली आहे. यावेळी जोरदार जल्लोषात या प्राण्यांच्या टक्कर लावून आणि जोरजोरात ओरडून या स्पर्धेत नागरिकांनी जोरदार गोंधळ घातला होता.
जीवघेण्या स्पर्धा… pic.twitter.com/8JEjVpg7lb
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 11, 2022
दिवसढवळ्या स्पर्धेचे आयोजन
अशी जीवघेण्या स्पर्धेला बंदी असतानाही बीडमध्ये मात्र दिवसढवळ्या या स्पर्धेचे आयोजन केले गेले होते. लाऊड स्पीकर लावून जंगी स्पर्धेचे आयोजन केले गेले होते, तरीही याचा थांगपत्ता बीड पोलिसांना लागला नाही हे विशेष होते. मोकळ्या रानावर रेड्यांच्या जीवघेण्या स्पर्धा होत असल्याने प्राणीमित्र संघटनेकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सिंधुदुर्गात गुन्हा दाखल
बैलगाडा स्पर्धा राज्यभरात सुरु झाल्यानंतर अशा कार्यक्रमांचे अनेक ठिकाणी आयोजन केले जात आहे. मात्र प्राण्यांच्या झुंज लावणे, अशा आयोजनामध्ये प्राणी जखमी होणे, त्यांचा यामध्ये मृत्यू होणे अशा घटना वारंवार घडतात. मात्र तरी देखील अशा स्पर्धांकडे प्रशासनाकडून दुर्लक्षे केले जाते. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी बैलांच्या झुंजींचे आयोजन केले गेले होते. त्यावेळी बैलांच्या झुंजीनंतर त्या स्पर्धेत जखमी होऊन एका बैलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्राणीमित्र संघटनांनी आयोजकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांनी आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
आरडाओरड आणि गोंधळ
बीडमध्ये जल्लोषात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, या रेड्यांच्या टक्करी लावल्यानंतर सहभागी झालेले रेडे टक्कर लावल्यामुळे जखमी झाले होते. या स्पर्धेचे आयोजन केल्यानंतर आणि आरडाओरड होऊनही या प्रकाराबद्दल पोलिसांकडून कोणतीही दखल घेण्यात आली नव्हती.
संबंधित बातम्या
Phone Tapping : “मी पुन्हा येईन” या नादात माझीच फोन टॅपिंग, खडसेंचा फोन 67 दिवस टॅप केल्याचा आरोप