दादासाहेब खिंडकरच्या जीवाला धोका? वाल्मिक कराड कनेक्शन समोर
दादासाहेब खिंडकर याच्या जीवाला धोका असल्याचा दावा त्याची पत्नी आश्विनी खिंडकर यांनी केला आहे. कारागृहात वाल्मिक कराड आहे, त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

मोठी बातमी समोर येत आहे. दादासाहेब खिंडकर याच्या जीवाला धोका असल्याचा दावा त्याची पत्नी आश्विनी खिंडकर यांनी केला आहे. कारागृहात वाल्मिक कराड आहे, त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांनी आवाज उठवला म्हणून त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. धोका झाल्यास याची जबाबदारी कारागृह प्रशासनाची असेल, असं दादासाहेब खिंडकर याची पत्नी आश्विनी खिंडकर यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या आश्विनी खिंडकर?
मी आज माझे पती दादासाहेब खिंडकर यांना भेटण्यासाठी जिल्हा कारागृहात गेले होते. तेव्हा त्यांनी मला माझ्या जिवाला धोका असल्याचे सांगितले आहे. कारागृहात वाल्मीक कराड आहे त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका होऊ शकतो. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठविला म्हणून त्यांच्या जिवाला धोका होऊ शकतो. धोका झाल्यास याची जबाबदारी कारागृह प्रशासनाची असेल. माझ्या पतीला कारागृहात खूप त्रास सुरू आहे. त्यांना टॉर्चर केलं जात आहे. मी कारागृह अधीक्षकांना भेटले नाही. केवळ पत्रव्यवहार केला आहे. माझ्या पतीची बराक बदलून द्यावी, अशी माझी मागणी आहे, असं आश्विनी खिंडकर यांनी म्हटलं आहे.
मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
दादासाहेब खिंडकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये तो एका व्यक्तीला अमानूष मारहाण करताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सध्या तो जिल्हा कारागृहात आहे. मात्र आपल्या पतीच्या जीवाला धोका असल्याचा दावा त्याची पत्नी आश्विनी खिंडकर यांनी केला आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात आवाज उठवल्यानं माझ्या पतीच्या जीवाला धोका आहे, वाल्मिक कराडपासून त्याच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे माझ्या पतीची बराक बदलून द्यावी, अशी माझी मागणी खिंडकरच्या पत्नीने केली आहे.
दरम्यान बीड जिल्ह्याच्या मस्सोजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात सीआयडीकडून आरोप पत्र दाखल करण्यात आलं आहे, त्यामध्ये वाल्मिक कराड हाच या हत्याकांडाचा मास्टरमाईंड असल्याचं म्हटलं आहे.