नवीन वर्षानिमित्त देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला, म्हणाले, दारुऐवजी लोकांनी … प्यावं
मी तर व्यसनमुक्तचं आहे. व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमात येऊन मी काय करू. मी तर व्यसनमुक्तचं आहे.
बीड : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीडमध्ये एका कार्यक्रमात होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, एका व्यक्तीनं व्यसनमुक्तीची मोठी रॅली नि मोठा कार्यक्रम करायचा आहे, असं मला सांगितलं.अलीकडच्या काळात नवीन वर्ष साजरं करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात दारु आणि इतर व्यसनांची पार्टी केली जाते. युवा पिढीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. दारु पिऊन लोकं भांडण करतात. अपघात होतात. चरस, गांजा ओढण्याचा प्रयत्न केला जातो. अशा सगळ्या लोकांना व्यसनापासून दूर करायचं आहे, असा त्या व्यक्तीचा संकल्प होता.
ते व्यक्ती म्हणाले, त्यामुळं मी ठरवलंय. रात्री दारु नाही, तर मसाला दूध लोकांनी पिलं पाहिजे. नवीन वर्षाचं स्वागत केलं पाहिजे. हा कार्यक्रम मी घेतोय. हा खूप चांगला संकल्प आहे. राज्यातील इतर जिल्ह्यातही हा उपक्रम पोहचेल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी त्यांना गमतीनं म्हणालो, मी तर व्यसनमुक्तचं आहे. व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमात येऊन मी काय करू. मी तर व्यसनमुक्तचं आहे. मला कुठंलंच व्यसन नाही. व्यसन नाही केलं तर माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो म्हणून मी तुम्हाला याठिकाणी बोलवतोय, असं त्या व्यक्तीनं म्हंटलं, असं फडणवीस यांनी सांगितलं.
नवीन वर्षाची धामधूम सुरू आहे. २०२२ चं सरत वर्ष कसं घालवायचं याचे आराखडे तयार आहेत. अशावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हा सल्ला दिला. दारुऐवजी दूध प्या नि निरोगी राहा, असं त्यांना या क्रार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचं होतं.