अपघातानंतर इतक्या दिवसांनी धनंजय मुंडे परळीत परतले; आई, पत्नी, मुलीनं केलं औक्षण

धनंजय मुंडे मुंबईहून थेट गहिनीनाथ गडावर दर्शनासाठी पोहचले. तिथे समर्थकांनी मोठ्या डौलात स्वागत केले. परळीमध्ये आल्यानंतर मात्र रस्त्यावर लावलेले "अभी टायगर जिंदा है" पोस्टर लक्ष वेधून घेणारे ठरले.

अपघातानंतर इतक्या दिवसांनी धनंजय मुंडे परळीत परतले; आई, पत्नी, मुलीनं केलं औक्षण
धनंजय मुंडे यांचे औक्षण करताना आई व इतर.
Follow us
| Updated on: Feb 12, 2023 | 9:46 PM

महेंद्रकुमार मुधोळकर, प्रतिनिधी, परळी (बीड): राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) परळी दाखल झाले आहेत. परळीत (Parli) दाखल झाल्यानंतर पंढरी निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. अपघातानंतर ३९ दिवसांनी ते परळीत बरे होईन परतले. आई, पत्नी आणि त्यांच्या मुलींने औक्षण करत त्यांचं घरात स्वागत केले. या ठिकाणी मुंडेंना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली. कार अपघातात बचावल्यानंतर राष्ट्रवादीचे परळीचे आमदार धनंजय मुंडे हे उपचारानंतर आज पहिल्यांदाच मतदार संघात दाखल झाले आहेत. लाडका नेता येणार असल्याने धनंजय मुंडे समर्थकांनी अक्षरशः संपूर्ण परळी सजविली आहे. मुंडेंच्या परळीत जणू काही दिवाळी आहेच असाच क्षण सध्यातरी पाहावयास मिळतोय.

तारीख 3 जानेवारी वार मंगळवार. वेळ रात्रीची साधारणपणे साडेबारा. राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांच्यासाठी ती काळरात्रच होती. कार्यक्रम आटोपून घराकडे निघाल्यावर धनंजय मुंडे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला अन त्या अपघातात धनंजय मुंडे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर मुंबईत उपचार झाल्यानंतर ते बरे झाले.

39 दिवसांनी मतदारसंघात परतले

अपघातानंतर धनंजय मुंडे हे तब्बल 39 दिवसांनी मतदारसंघात येत आहेत. त्यामुळे मुंडे यांचा परळीत जोरदार स्वागत झाले आहे. लाडक्या नेत्याच्या स्वागतासाठी 101 जेसीबी, दहा टन फुलं, मोतीची लाडू, लेझीम पथक, पथनाट्य, फटाक्यांची आतिषबाजी, डीजे आणि बरंच काही दिमतीला आहे.

“टायगर अभी जिंदा है” पोस्टर

धनंजय मुंडे मुंबईहून थेट गहिनीनाथ गडावर दर्शनासाठी पोहचले. तिथे समर्थकांनी मोठ्या दामडौलात स्वागत केले. परळीमध्ये आल्यानंतर मात्र रस्त्यावर लावलेले “अभी टायगर जिंदा है” पोस्टर लक्ष वेधून घेणारे ठरले.

धनंजय मुंडे समर्थकांचा आगळावेगळा समारंभ

मुंडे यांच्या अपघातानंतर राज्याच्या राजकारणात धनंजय मुंडे यांची चर्चा थांबली होती. परळी म्हंटल्यावर मुंडे भावंडं आणि त्यांचं कट्टर राजकीय राजकारण राज्याच्या लक्षात येते. अशात नगरपालिका आणि जिल्हापरिषद निवडणुका तोंडावर आहेत. शिक्षक मतदार संघ असो वा राज्यातील पोटनिवडणुकीत धनंजय मुंडे यांची कुठेही चर्चा नव्हती. त्यामुळेच धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी आजचा हा आगळावेगळा स्वागत समारंभ आयोजित करून टायगर अभी जिंदा है असा मेसेज दिलाय.

धनंजय मुंडे यांनी परळीच्या वैजनाथ मंदिरात जाऊन पूजा केली. धनंजय मुंडे यांच्या दौऱ्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मुंडे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. परळीत त्यांचे खुल्या जीपमधून स्वागत करण्यात आले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.