महाप्रबोधन यात्रेआधीच बीडमध्ये ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर, सुषमा अंधारे यांच्यावर माजी जिल्हाप्रमुखांचे गंभीर आरोप

ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांच्या वादात आता सुषमा अंधारे यांचे विभक्त असलेले पती आणि शिंदे गटाचे नेते वैजनाथ वाघमारे यांनी देखील उडी घेतली आहे. महाप्रबोधन यात्रेसाठी सुषमा अंधारे यांनी 50 लाख रुपये गोळा केल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे.

महाप्रबोधन यात्रेआधीच बीडमध्ये ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर, सुषमा अंधारे यांच्यावर माजी जिल्हाप्रमुखांचे गंभीर आरोप
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 5:01 PM

महेंद्र मुधोळकर, प्रतिनिधी, बीड : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या कार्यकर्त्यांना पैसे मागतायेत. त्या पदाधिकाऱ्यांना धमकावत आहेत. म्हणून मी त्यांना दोन चापटा मारल्याचा दावा ठाकरे गटाचे निलंबित झालेले जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केला आहे. मात्र आप्पासाहेब जाधव हे शिंदे गटाला मिळाले असल्याचा आरोप करत त्यांच्याकडून मला कसलीही मारहाण नाही. त्यांचे भांडण इतर पदाधिकाऱ्यांसोबत झाले होते. उद्या होणाऱ्या महाप्रबोधन यात्रेला गालबोट लागावे म्हणून आप्पासाहेब जाधव यांनी षड्यंत्र केल्याचा प्रतिआरोप सुषमा अंधारे यांनी केलाय.

सभेसाठी ५० लाख जमा केले

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी सुषमा अंधारे यांच्यासह ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत. उद्या होणाऱ्या सभेसाठी विविध ठिकाणाहून पैसे गोळा करण्यात आले. यावरूनच अंधारे आणि शिवसैनिकांमध्ये वाद झाला. एकट्या बीड जिल्ह्यातून या सभेसाठी 50 लाख रुपये जमा केल्याचंदेखील वाघमारे यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

तर सभा उधळून लावू

पैशांचा दुरुपयोग केला म्हणून जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांनी मारहाण केली. या पैशातून अंधारे यांनी स्वतःचं घर भरलं आहे. मात्र उद्या होणाऱ्या सभेआधी कर्मचाऱ्यांकडून घेतलेले पैसे परत केले नाही, तर मात्र सभा उधळून लावू असा इशारा शिंदे गटाकडून देण्यात आला आहे.

अंधारे आणि जाधव यांच्यात भांडण

ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांच्या वादात आता सुषमा अंधारे यांचे विभक्त असलेले पती आणि शिंदे गटाचे नेते वैजनाथ वाघमारे यांनी देखील उडी घेतली आहे. महाप्रबोधन यात्रेसाठी सुषमा अंधारे यांनी 50 लाख रुपये गोळा केल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे. गोळा केलेल्या पैशामुळेच सुषमा अंधारे आणि आप्पासाहेब जाधव यांच्यात भांडण झाले.

कार्यकर्त्याकडून दोन-दोन लाख घेतल्याचा आरोप

महाप्रबोधन यात्रेआधीच ठाकरे गटातील पदाधिकऱ्यांचा वाद चव्हाट्यावर आलाय. नेत्या सुषमा अंधारे यांनी कार्यकर्त्यांकडून दोन-दोन लाख रुपये मागत होत्या. म्हणून त्यांना दोन चापटा मारल्याचा दावा माजी जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केला आहे. सुषमा अंधारे यांना मारहाण झाल्याचा दावा पुढे आल्यानंतर राजकीय क्षेत्रात मात्र खळबळ उडाली आहे.

बीड जिल्ह्यात ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा उद्या होणार आहे. मात्र त्याआधीच ठाकरे गटातल्या पदाधिकाऱ्यांकडून झालेल्या पैशाच्या आरोप प्रत्यारोपाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या प्रकरणाची चौकशी करून काय मार्ग काढतील हेच पाहावे लागणार आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.