वडील शिंदे गटात मंत्री, मुलगी राष्ट्रवादीच्या तिकिटावर ग्रामपंचायतीत विजयी, पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Dec 21, 2022 | 4:41 PM

मोठे सासरे शिवाजी पंडित, सासरे संभाजी पंडित, अमरसिंह पंडित यांच्यामुळे ही निवडणूक जिंकल्याचं त्या म्हणाल्या.

वडील शिंदे गटात मंत्री, मुलगी राष्ट्रवादीच्या तिकिटावर ग्रामपंचायतीत विजयी, पहिली प्रतिक्रिया
प्रेरणा पंडीत
Follow us on

बीड : प्रेरणा पंडित या राष्ट्रवादीच्या तिकिटावर सरपंच निवडून म्हणून आल्या. प्रेरणा पंडित या शिंदे गटाचे मंत्री सांदिपान भुमरे यांच्या कन्या आहेत. गावानं मला ३५४ मतांनी निवडून दिलं. माझे दिर अमरसिंह पंडित माजी आमदार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटातून उभी होती. विरोधात शिवसेनेकडून शुभांगी पंडित उभ्या होत्या. प्रेरणा पंडित म्हणाल्या, प्रचारात फिरली तेव्हा खूप साऱ्या समस्या दिसल्या. गावात स्वच्छ पाणी देण्याचं आश्वासन दिलं. महिलांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करणार. तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, असं आश्वासन दिलं, असं सांगितलं.

वडील मंत्री आहेत. मी जरी राष्ट्रवादीकडून सरपंच असेन. माझे वडील शिंदे गटाकडून मंत्री आहेत. पण, दैठण गावासाठी निधी देण्यासाठी कुठंही कमी पडणार नाही. ते त्यांच्या मुलीसाठी निधी देण्याचा प्रयत्न करतील, अशी अपेक्षा प्रेरणा पंडित यांनी व्यक्त केली.

सांदिपन भुमरे यांचा काल फोन आला. त्यांनी मला शुभेच्छा दिल्याचं प्रेरणा पंडित म्हणाल्या. सुरुवातीला गावकऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्या समस्या समजून घेणार. त्यानंतर समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

गावकऱ्यांचा चांगला रिस्पान्स होता. त्यामुळं राष्ट्रवादीच्या पारड्यात मतं टाकलीत. पॅनलमधील सात सदस्य निवडून आलेत. मी  ३५४ च्या लीडनं निवडून आले. मी निवडून आल्यानं ते खूप खूश झाल्याचंही प्रेरणा पंडित यांनी सांगितलं.

मोठे सासरे शिवाजी पंडित, सासरे संभाजी पंडित, अमरसिंह पंडित यांच्यामुळे ही निवडणूक जिंकल्याचं त्या म्हणाल्या. पण, लाडाच्या लेकीसाठी गावाच्या विकासासाठी वडील कसे सहकार्य करणार, हे येणारा काळच सांगेलं.