Beed Drown : नदीपात्रात बुडून चार अल्पवयीन मुलांचा मृत्यू; बीडमधील हृदयद्रावक घटना

चारही अल्पवयीन मुले शाळेला रविवारची सुट्टी असल्यामुळे नदीपात्रात पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी गेली होती. दुर्दैवाने हा आनंद त्यांच्यावर जीवावर बेतला. नदीपात्रातील खोल खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे चारही मुलांचा बुडून अंत झाला.

Beed Drown : नदीपात्रात बुडून चार अल्पवयीन मुलांचा मृत्यू; बीडमधील हृदयद्रावक घटना
सांकेतिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 2:32 AM

बीड : जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात चार अल्पवयीन मुलां(Minor Boys)चा नदीपात्रातील खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शहाजानपुर चकला येथील सिंदफणा नदीपात्रात ही घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. ही मुले शाळेला सुट्टी असल्याने पोहण्या(Swimming)चा आनंद घेण्यासाठी नदीत उतरली होती. नदीपात्रात सर्रास वाळूचा उपसा होतो. त्यामुळे याठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. याच खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे चार अल्पवयीन मुलांना जीव गमवावा लागल्याची बाब समोर आली आहे. आकाश सोनवणे, गणेश इनकर, बबलू वक्ते आणि अमोल कोळेकर अशी बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. (Four minors drown in river basin; The unfortunate incident in Beed)

रविवारच्या सुट्टीचा आनंद जीवावर बेतला

चारही अल्पवयीन मुले शाळेला रविवारची सुट्टी असल्यामुळे नदीपात्रात पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी गेली होती. दुर्दैवाने हा आनंद त्यांच्यावर जीवावर बेतला. नदीपात्रातील खोल खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे चारही मुलांचा बुडून अंत झाला. आकाश सोनवणे, गणेश इनकर, बबलू वक्ते आणि अमोल कोळेकर यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात ग्रामस्थांनी वाळू उपसा करणाऱ्यांना जबाबदार धरले आहे. संबंधित वाळू माफियांवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मुलांचे मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा संतप्त ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे घटना घडलेल्या शहाजानपूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर गेवराई तालुक्यात वाळू उपसा केल्या जाणाऱ्या माफियांविरोधातत रोष व्यक्त केला जात आहे.

वाळू उपशाला प्रशासनाची उदासीनता जबाबदार

गेवराई तालुक्यातील सिंदफणा नदीतून वाळूमाफिया वाळूचा बेसुमार उपसा करीत असल्याचे वारंवार उघडकीस आले आहे. याबाबत सजग स्थानिक ग्रामस्थ प्रशासनाचे लक्ष वेधतात. मात्र कातडी बचाव धोरण अवलंबणाऱ्या प्रशासनाकडून कुठलीही ठोस कारवाई केली जात नाही. प्रशासनाच्या वरदहस्तामुळे वाळू माफिया वाळू उपशाचा गोरखधंदा करीत असून हा प्रकार जीवावर बेतण्याच्या घटना घडू लागल्याने संताप व्यक्त होत आहे. रविवारी चार अल्पवयीन मुलांचा खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर तरी संबंधित प्रशासन जागे होऊन ठोस पावले उचलणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अवैध वाळू वाहतुकीचा प्रकार यापूर्वीही जीवावर बेतलाय!

गेवराई तालुक्यात अवैध वाळू वाहतूक आणि वाळू उपशाचा प्रकार जीवावर बेतल्याची घटना घडली आहे. डिसेंबर महिन्यात खामगाव येथील एका नागरिकाला अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने चिरडले होते. त्यात त्या नागरिकाचा हकनाक बळी गेला होता. त्यावेळी मृताच्या नातेवाईकांनी संतप्त भूमिका घेत दोषीवर जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. मात्र त्या घटनेनंतरही वाळू माफियांना जरब न बसल्याने परिसरात प्रशासनाविरोधात संतापाचे वातावरण आहे.(Four minors drown in river basin; The unfortunate incident in Beed)\

इतर बातम्या

Vasai Crime : नालासोपाऱ्यात राजस्थानातून विक्रीसाठी आणलेले 5 कोटींचे हिरॉईन जप्त, दोन आरोपींना अटक

Andhra Pradesh Accident : लग्नाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, आंध्र प्रदेशमध्ये कार-लॉरी अपघातात 8 ठार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.