संतोष देशमुख हत्याप्रकरणात किती दिवस सीआयडीकडे तपास नव्हता? पुराव्यांचं काय झालं? अंजली दमानिया यांचे धडाधड गौप्यस्फोट; कोर्टाकडे काय करणार मागणी?
Anjali Damania Big Claim : संतोष देशमुख हत्याप्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एका मागून एक बॉम्ब टाकले आहे. मे महिन्यातील एफआयआरपासून ते सीआयडी तपासापर्यंत त्यांनी केलेल्या प्रश्नांच्या फैरीने प्रशासन गांगरून जाणार आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली. त्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली. यंत्रणा हालली, सरकार जागी झाले. सुरुवातीपासून आरोपींना अभय दिल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एका मागून एक बॉम्ब टाकले आहे. मे महिन्यातील एफआयआरपासून ते सीआयडी तपासापर्यंत त्यांनी केलेल्या प्रश्नांच्या फैरीने प्रशासन गांगरून जाणार आहे.
कोणाची हिम्मत नव्हती त्यांच्या चौकशीची
आपण एसआयटीत पूर्णपणे बदल करण्याची मागणी लावून धरली होती. कारण बीडमध्ये जेवढे पोलिस ऑफिसर आहेत ते सरळ सरळ वाल्मीक कराडच्या आशीर्वादानेच तिथे येतात तर असं असताना कुठच्या पोलीस ऑफिसरमध्ये हिम्मत असेल की ते परळीकरांची पूर्ण चौकशी करू शकतील? असा सवाल दमानिया यांनी केला.
इतकी दिरंगाई का?
नवीन एसआयटी बनवायला हवी आणि जिल्हा बाहेरच्या ऑफिसरची व्हावी जे आता का नव्हता ना दिसते पण याच्यात तर असं विशेष काही वाटत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. जेवढा कालावधी गेला आहे. म्हणजे या तपासात आणि जी दिरंगाई हे केले गेले एकतर एसआयटी तयार करण्यात, सीआयडी पथक पाठवण्यात इतके दिवस हे लागले. 9 डिसेंबरपासून ते जवळजवळ 27-28 डिसेंबरपर्यंत सीआयडी कडे तपास दिला गेला नव्हता तो तिथल्या स्थानिक पोलीसकडे होता. त्यामुळे पुरावे नष्ट होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
राजकीय दबावामुळे न्याय मिळेल का?
मे महिन्यापासून अवादा कंपनीचे शिंदे यांनी एकदा नाही तर अनेकदा तक्रार केली. त्यांच्या तक्रारीआधारे 365, 385,147,148,149 आणि आर्म्स एक च्या 4 अँड 25 इतके गंभीर कलमं लावण्यात आली होती. पण चौकशी झाली नव्हती. आमच्याविरोधात बोलाल तर तुमची सुद्धा इतकी क्रूर हत्या करू असा तो इशाराच होता. धनंजय मुंडे यांचा दबाव असल्यानेच चौकशी झाली नसल्याचा आरोप दमानिया यांनी केला. एवढा आक्रोश करून सुद्धा राजकीय दबावामुळे न्याय मिळतात दिसत नाही, असे त्या म्हणाल्या.
माजी न्यायाधीशांची अद्याप नियुक्ती नाही
या प्रकरणात निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात येणार होती. त्यांची नियुक्ती कधी होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे? अजून किती कालावधी लावणार आहात आणि किती आम्हाला त्रास देणार आहात, जनतेच्या मनातील हा प्रश्न मला त्यांना विचार असा वाटतो?, असे दमानिया म्हणाल्या.
वाल्मिकी कराडवर ईडीची चौकशी
त्यांनी यावेळी वाल्मिक कराडची ईडी चौकशीची मागणी केली. 7 ऑफिस फक्त एका बिल्डिंगमध्ये नाहीत त्यांच्या कित्येक लोकांच्या नावावर बेनामी प्रॉपर्टीज देखील आहेत तर हे बेनामी ट्रांजेक्शन खाली सुद्धा त्यांच्या चौकशी झाल्या पाहिजे. सगळ्या गोष्टींवर चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तर या सर्व प्रकरणात आता न्यायालयीन चौकशीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.