बीड : जमिनीच्या क्षुल्लक वादातून एका शेतकरी (Farmer) कुटुंबाला बेदम मारहाण (Beating) केल्याची घटना बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यात उघडकीस आली आहे. या मारहाणीत शेतकऱ्यासह त्याची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी (Injured) झाले आहेत. जखमींना उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बाळासाहेब उजगरे, शकुंतला उजगरे, निखील उजगरे अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. या मारहाणीचे चित्रण मोबाईलमध्ये करण्यात आले असून सोशल मीडिया हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी दिंद्रुड पोलीस स्टेशनमध्ये बाळासाहेब उजगरे यांच्या फिर्यादीवरून नऊ जणांवर ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Video : बीडमध्ये जमिनीच्या क्षुल्लक वादातून शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण, घटनेचा व्हिडीओ व्हायरल#beed #farmer #family #beaten #crime #video #viral pic.twitter.com/CuSDrBhIBl
हे सुद्धा वाचा— TV9 Marathi (@TV9Marathi) May 29, 2022
धारुर तालुक्यातील कोथिंबीरवाडी येथील शेतकरी बाळासाहेब रोहिदास उजगरे हे काल सकाळी नेहमीप्रमाणे शेतात काम करत होते. याच दरम्यान शेजारील अजय भानुदास तिडके व सिद्धेश्वर भानुदास तिडके यांनी उजगरे यांच्या शेतात दगडे टाकण्यास सुरुवात केली. उजगरे यांनी त्यांना शेतात दगड टाकू नका म्हणून सांगितले. याचाच राग मनात धरून भांडणाची कुरापत काढून शिव्या द्यायला व मारहाण करायला सुरूवात केली. तसेच लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. या मारहाणीत बाळासाहेब उजगरे, त्यांची पत्नी शकुंतला उजगरे, मुलगा निखील उजगरे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पतीवर लाठ्याकाठ्यांनी हल्ला सुरु असताना पत्नीने अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी त्यांनाही मारहाण केली. या संतापजनक प्रकारचा व्हिडीओ व्हायरल झाला असून सर्वत्र रोष व्यक्त करण्यात येत आहे. (In Beed a farmers family was beaten over a minor land dispute)