Manoj Jarange : ‘या निवडणुकीत असे पाडा की पाच पिढ्या घरी बसल्या पाहिजे’, मनोज जरांगेंचा रोख कुणावर

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा आंदोलन चिघळले होते. राज्य सरकारने यशस्वी मध्यस्थी केली. पण सरकारने आपली फसवणूक केल्याचे वक्तव्य मनोज जरांगे यांनी केल्यानंतर पुढील दिशा काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आता जरांगे पाटील यांच्या विधानाने अनेकांच्या मनात धडकी भरवली आहे.

Manoj Jarange : 'या निवडणुकीत असे पाडा की पाच पिढ्या घरी बसल्या पाहिजे', मनोज जरांगेंचा रोख कुणावर
मनोज जरांगेंचा थेट इशारा
Follow us
| Updated on: May 10, 2024 | 10:18 AM

गेल्या वर्षाच्या मध्यांतरानंतर आणि या वर्षाच्या सुरुवातीला मराठा आंदोलनाच्या वादळाने सरकार हादरवले. मुंबईच्या वेशीत, वाशीमध्ये मराठा आंदोलनाचा काही आश्वासनानंतर सांगता झाली. त्यानंतर सरकारावर फसवणुकीचा आरोप करत जरांगे पाटील यांनी उपोषण केले. काही दिवसानंतर ते मागे घेतले. लोकसभा निवडणुकीच्या धुमाळीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सामंजस्याची भूमिका घेतली. पण काल रात्री बीडमधील आष्टीजवळील एका सभेत त्यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मराठ्यांच्या भीतीने पाच टप्प्यात मतदान

अंबोरा येथील सभेत मनोज जरांगे पाटील यांनी अनेक मुद्यांना हात घातला. मराठा ताकतीने एकत्र आला आहे. देशाने धास्ती घेतली आहे. एकीची भीती एवढी बसली आहे की चांगल्या चांगल्याने गुडघे टेकावे लागत आहे.मराठा एक झाला म्हणून राज्यात पाच टक्क्यात निवडणूक लागली. दुसरीकडे एक आणि.दोन टप्प्यात निवडणुका होत आहे. हाच मराठ्यांचा विजय आहे, असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मोदी सध्या गोधड्या घेऊन मुक्कामी

भाजपला आमचा कधीही विरोध नव्हता, आमच्या माय लेकीचे डोके फोडले.मोदी सध्या गोधड्या घेवून मुक्कामी आहेत. मी कोणालाही निवडून द्या म्हटलो नाही. असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांवर तोंडसूख घेतले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला, हे त्यांनी ठासून सांगितले.

भाजप नेत्यांवर टीकेचे बाण

यावेळी त्यांनी भाजप नेत्यांवर टीकेचे बाण सोडले. चंद्रकांत पाटील, गिरीश महाजनांसह देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी भाषणातून लक्ष केले. कोल्हापूरचा चंद्रकांत पाटील यांना तेरे नाम, खेकड्याची ओलाद असे ते म्हणाले. मी कधी नादी लागलो रे तुझ्या अशी टीका त्यांनी केली. फडणवीस साहेब तेरे नाम ला समजून सांगा. जामनेरच्या पंधरा रुपयाचा पट्टा घालणाऱ्या लां मी नीट केले आहे, असा टोला त्यांनी हाणला.

असे पाडा की पाच पिढ्य घरी बसल्या पाहिजे

या सभेत जरांगेंच्या एका विधानाने अनेकांच्या मनात धडकी भरवली. या निवडणुकीत असे पाडा की पाच पिढ्या घरी बसले पाहिजे. माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास दिला तर पुढच्या दहा पिढ्या मराठे तुमच्या कपाळाला गुलाल लावणार नाहीत दुसऱ्यासाठी मराठा समाजाच्या विरोधात जाऊ नका, ही शेवटची संधी आहे तुम्हाला, असा इशारा त्यांनी दिला. जात महत्वाची आहे, तो आपल्यासोबत आला नाही तर त्याला जिल्हा परिषद ,सरपंच पदाला पाडा. मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका, परिणाम भोगावे लागतील. मोदी इथे मुक्कामी आहे. मराठा कुणबी कायदा पारित नाही केला तर विधानसभेला बघतो, असा इशारा पण त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.

D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.