‘काहीतरी खिचडी शिजत आहे’, जेलमध्ये कोणाच्या जीवाच्या धोका? महादेव गित्तेच्या पत्नीचा मोठा दावा
संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना आज बीडच्या जिल्हा कारागृहात मारहाण झाल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणात आता महादेव गित्तेच्या पत्नीने मोठा दावा केला आहे.

संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना आज बीडच्या जिल्हा कारागृहात मारहाण झाल्याची माहिती समोर आली होती. महादेव गिते आणि अक्षय आठवले यांनी मारहाण केल्याचं बोललं जात आहे. मात्र तुरुंग प्रशासनाकडून असं काही घडलं नसल्याचं सांगण्यात आलं आहे. तर दुसरीकडे आम्हालाच वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून मारहाण करण्यात आल्याचा आरोप महादेव गित्तेनं केला आहे. दरम्यान त्यानंतर महादेव गित्ते याची रवानगी छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे. आता या प्रकरणावर महादेव गितीची पत्नी मीरा गीते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाल्या मीरा गिते?
एवढ्या लवकर सगळ्या गोष्टी झाल्या कशा हा माझा सवाल आहे, मारहाण झाली असेल तर त्याचे सीसीटीव्ही पुरावे असतील, ते समोर आणा. त्यात कोण कोणाला मारले हे पाहा. स्वतः कारागृह अधीक्षक म्हणत आहेत वाल्मीक कराड आणि घुले यांना मारहाण झाली नाही. महादेव गीते यांना दहा लोक येऊन मारतात, गँग वगैरे आहे, सगळी वाल्मिक कराडची पद्धत आहे. चार जणांची कुठे टोळी असते का? असं मीरा गिते यांनी म्हटलं.
संतोष भैया देशमुख यांच्या मारेकऱ्यांनी मारहाण केली आणि परळीचे जे आत्ताचे आरोपी आहेत, त्यांनीही मारहाण केली, मारहाण करून माझ्या पतीला साधं रुग्णालयात उपचारासाठी देखील दाखल केलं नाही. जेवढं फास्ट माझ्या पतीला हार्सुल कारागृहात हलवलं, तेवढेच फास्ट मला पुरावे द्या. बीड जेलमधून त्यांना हर्सुल जेलमध्ये नेत असताना त्यांच्यासोबत बोलणं झालं, त्यात त्यांनी सांगितले मला वाल्मिकच्या लोकांनी येऊन मारले, माझ्यावर अन्याय झाला आहे. माझ्या बॅरेक जवळ येऊन या लोकांनी मला मारहाण केल्याचं त्यांनी सांगितलं, या प्रकरणात अक्षय आठवलेचं देखील नाव घेतलं गेलं, मग त्यांना हर्सूलमध्ये का नेण्यात आलं नाही. काहीतरी खिचडी शिजत आहे असा माझा आरोप आहे, हिंडकर आणि अक्षय आठवले यांच्या जीवितास जेलमध्ये धोका आहे, असा दावा देखील मीरा गिते यांनी केला आहे.