काँग्रेस नेत्याला दिलेला शब्द पवारांनी पाळला, ‘खाली डोकं वर पाय’ करणाऱ्या संजय दौंड यांच्या आमदारकीची इंटरेस्टिंग गोष्ट

राज्यपाल कोश्यारी यांनी राष्ट्रगीत पूर्ण होण्याआधीच निघून जात राज्याचा अपमान केल्याचा निषेध  करण्यासाठी दौंड यांनी शीर्षासन केल्याचं सांगितलं. संजय दौड हे बीडमधून राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार आहेत. त्यांच्या निवडीमागील कहाणी अत्यंत इंटरेस्टिंग आहे.

काँग्रेस नेत्याला दिलेला शब्द पवारांनी पाळला, 'खाली डोकं वर पाय' करणाऱ्या संजय दौंड यांच्या आमदारकीची इंटरेस्टिंग गोष्ट
(डावीकडे) संजय दौंड आणि शरद पवारImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 12:46 PM

मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Budget Session) पहिल्याच दिवशी जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. राज्यपालांच्या अभिभाषणावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी घोषणाबाजी  केल्याने भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर विधानपरिषद आमदार संजय दौड (Sanjay Daund) यांनी चक्क विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच खाली डोकं वर पाय केलं. राज्यपाल कोश्यारी यांनी राष्ट्रगीत पूर्ण होण्याआधीच निघून जात राज्याचा अपमान केल्याचा निषेध  करण्यासाठी दौंड यांनी शीर्षासन केल्याचं सांगितलं. संजय दौड हे बीडमधून राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार आहेत. त्यांच्या निवडीमागील कहाणी अत्यंत इंटरेस्टिंग आहे.

धनंजय मुंडेंच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक

विधान परिषद सदस्य असलेले कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे बीडमधील परळी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. त्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी 24 जानेवारी 2020 रोजी पोटनिवडणूक होणार होती. या जागेसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीतर्फे संजय दौंड, तर भाजपकडून राजन तेली निवडणुकीच्या मैदानात उतरले होते.

कोण आहेत संजय दौंड?

संजय दौंड हे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते पंडितराव दौंड यांचे सुपुत्र आहेत. पंडितराव दौंड आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जुने राजकीय ऋणानुबंध आहेत. संजय दौंड यांनी अनेक वर्षे बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केलं होतं. ते 1992 पासून जिल्हा परिषद सदस्य होते.

पवारांनी काय शब्द दिला होता?

विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या विजयासाठी प्रयत्न केल्याच्या मोबदल्यात काँग्रेस नेते पंडितराव दौंड यांचे पुत्र संजय दौंड यांना संधी देण्याचा शब्द शरद पवार यांनी दिला होता. संजय दौंड काँग्रेसमध्ये होते, मात्र शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेला शब्द पाळण्यासाठी विधानपरिषदेवर त्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. संजय दौंड यांना तिकीट मिळालं.

विधानपरिषदेवर बिनविरोध

विधान परिषदेत महाविकास आघाडीकडे 170 सदस्यांचं बळ होतं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय निश्चित होता. त्यामुळे भाजप उमेदवार राजन तेली यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि संजय दौंड यांची बिनविरोध निवड झाली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात शीर्षासन

दरम्यान, आमदार संजय दौड यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी चक्क विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच खाली डोकं वर पाय केलं. राज्यपाल कोश्यारी यांनी राष्ट्रगीत पूर्ण होण्याआधीच निघून जात राज्याचा अपमान केल्याचा निषेध  करण्यासाठी दौंड यांनी शीर्षासन केल्याचं सांगितलं.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Video : आणि आ. संजय दौंड यांनी खरोखरच खाली डोकं वर पाय केलं, राज्यपालांच्या विरोधात निषेधासन

जुते मारो सालों को, भाजपाच्या आमदारांकडून भरसभागृहात नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी घोषणाबाजी

राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव, आदित्य ठाकरे, पटोले, वडेट्टीवारांच्या नेतृत्वात सत्ताधाऱ्यांची कुरघोडी

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.