Manoj Jarange : एकदा त्यांचं दाताडं पडू द्या, दसरा सभा सुरू होण्यापूर्वीच मनोज जरांगे यांचा विरोधकांना चिमटा

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांची बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नगद नारायण गडावर पहिला दसरा मेळावा होत आहे. या सभेच्या सुरुवातीलाच मनोज जरांगे पाटील यांनी विरोधकांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दाखवत त्यांनी, एकदा त्यांचं दाताडं पडू द्या, असा चिमटा काढला.

Manoj Jarange : एकदा त्यांचं दाताडं पडू द्या, दसरा सभा सुरू होण्यापूर्वीच मनोज जरांगे यांचा विरोधकांना चिमटा
मनोज जरांगे यांचा सुरुवातीलाच निशाणा
Follow us
| Updated on: Oct 12, 2024 | 1:40 PM

बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नगद नारायण गडावर मनोज जरांगे पाटील यांनी दसऱ्याच्या सभेच्या सुरूवातीलाच विरोधकांवर हल्ला केला. त्यांनी कुणाचे नाव घेतले नाही. पण या गडावर इतकी गर्दी होईल, असे वाटले नव्हते. अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली. त्यांनी मीडियाला विनंती केली की ही गर्दी दाखवा. त्याचं दातडं पडू द्या. त्यांना आता ही गर्दी पाहून रुग्णालयचं जवळ करावं लागेल, असा चिमटा जरांगे पाटील यांनी काढला.

गर्दी पाहून त्यांचा कार्यक्रम

प्रथम या जनसमुदायाच्या चरणी मी मनापासून नतमस्तक होत आहे. खरंच वाटलं नव्हतं एवढी गर्दी होईल. मी खोटं बोलत नाही. अर्ध्याच्यावर लोकं सरकारी दवाखान्यात जातील. नजर जाईल एवढे लोकं येतील असं खरंच वाटलं नव्हतं. मला एकजण म्हणाला, ह्यँ ह्यँ केलं. ५०० एकर असतं का कुठं असं म्हणत होता. आता तो दिसत नाही. मी मीडियाला कधीच विनंती केली नाही. पण आता करतो. चारही बाजूला कॅमेरे फिरवा. तुम्ही फ्रेम दिले असले तरी एकदा मात्र हा जनसमुदाय राज्याला दिसू द्या. कानाकोपऱ्यातील बांधव दिसू द्या. एकदा दाखवाच. नुसती गर्दी पाहूनच त्यांचा कार्यक्रम होईल, असे जरांगे पाटील म्हणाले.

हे सुद्धा वाचा

पाडळशिंगपर्यंत रस्ते जाम

पाडळशिंगी पर्यंत चारही मार्ग लॉक आहेत. बीडमध्ये सर्व रस्ते जाम आहेत. कधी वाटलं नव्हतं आपण या ताकदीने एकत्र याल म्हणून. हा जनसमुदाय न्यायाचा आहे. एका दुखाकडून सुखाकडे जायचं आहे. या समुदायावर संस्कार आहेत. संस्कार. ते संस्कार कधीच जातीवाद करत नाहीत. प्रचंड ताकदीने असणारा हा समुदाय आहे. या राज्यावर समुद्रासारखा पसरला आहे. पण कधीच मस्तीत आणि मग्रुरीत हा समाज वागत नाही. कधीच हा समुदाय मस्तीत आणि मग्रुरीत वागला नाही. प्रत्येकाला सांभाळण्याचं, साथ देण्याचं काम केलं आहे. यांनी कधी जातीवाद केला नाही. त्यांना कधी जात शिवली नाही, असे ते म्हणाले. या सभेला राज्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने मराठा बांधव आले आहेत.

जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'.
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द.
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन.
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?.
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी...
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी....
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या....
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर.
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?.
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....