Big Breaking : ‘देव आडवा आला तरी आरक्षण मिळवणार’, मुंबईत ‘या’ दिवसापासून आमरण उपोषणाची मनोज जरांगे यांची घोषणा

मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवली आहे. आता पुढे थेट मुंबईमधील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याचं जरांगे यांनी बीडमधील सभेत बोलताना सांगितलं आहे.

Big Breaking : 'देव आडवा आला तरी आरक्षण मिळवणार', मुंबईत 'या' दिवसापासून आमरण उपोषणाची मनोज जरांगे यांची घोषणा
Manoj Jarange Patil Amaram Uposhan Mumbai
Follow us
| Updated on: Dec 23, 2023 | 6:01 PM

बीड : राठा आरक्षणाचा विषय आता चांगलाच पेटणार असल्याचं दिसत आहे. मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा उद्या म्हणजेच 24 डिसेंबरल शेवटचा दिवस आहे. त्याआधी मनोज जरांगे यांनी बीडमध्ये घेतलेल्या सभेत मोठी घोषणा केली आहे. मनोज जरांगे आमरण उपोषण करणार असून आता मोर्चा थेट मुंबईकडे येणार आहे. मुंबईमध्ये 20 जानेवारीला आझाद मुंबईवर उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण

मुंबईतील आझाद मैदानात 20 जानेवारीपासून आमरण उपोषण करणार आहेत. आपल्या पिकाला पाणी देऊन घ्या. अंतरवाली हून मराठ्यांचा जनसागर मुबंईला जायचं आहे. मराठा समाजाला डाग लागला नाही पाहिजे, कोणी गाडी पेटवायला लागला तर त्याला जाग्यावर पकडून पोलिसांकडे द्यायचं, आपला असेल तरी त्याला पकडून पोलिसांकडे द्या. मराठा समाजाचे आमदार, खासदार आणि मंत्री यांना विनंती आहे. मराठा समाजाच्या लेकरांच्या पाठीशी उभे रहा. जर पाठीशी उभे नाही राहिलात तर मराठ्यांचे घर तुम्हाला कायम स्वरूपी बंद राहिल, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

आता देव जरी आडवा आला तरी मराठे आरक्षण मिळवणार- जरांगे

मुंबईला जायचा मार्ग दोन तीन दिवसात ठरवूयात, कुठून कसे, काय दिसते ते पाहू. कोण ट्रॅक्ट्रर कसा अडवतो ते बघतो. आमचा ट्रॅक्टर, डिझेल आमचं सगळं आमच तू कसं अडवतो. भुजबळच्या पोटात आळी आहे. आभाळ आलं की ती आळी वळवळ करते. मराठे जर मुबंईकडे निघाले तर मराठ्यांचा विराट समुदाय माघारी फिरणार नाही. आता माघार नाही. आता देव जरी आडवा आला तरी मराठे आरक्षण मिळवणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळांर नाव न घेता

मराठा कधीच जाळपोळ करू शकत नाही. कुणाच्या घरावर जाऊ शकत नाही. यांची घरे यांनीच फोडले. आमच्यावर नाव घेत आहे. यांनाच कंड आहे. सर्व बावचळले आहेत. येवल्याच्या येडपटाने त्यांच्या पाहुण्यांची हॉटेल जाळली. बाजारात पिशवी घेऊन हिंडत आहे. बघा आम्हाला कशा शिव्या देतात. कशाला मग बोलतो. आता पिशवी घेतली. आता केळाची सालं आणि चपला दिसतील. तुला आताच खाल्लेलं पचत नाही. थांब थोडं. माझ्या नादी लागू नको आधीच सांगितलं होतं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.