‘…तर भाजपचा 48 पैकी एकही खासदार निवडून येऊ देत नसतो’; मनोज जरांगेचं फडणवीसांसह भाजपला आव्हान
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली आहे. इतकंच नाहीतर थेट भाजपलाही आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आव्हान दिलं आहे.
बीड | मराठा आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यावर जहरी टीका केली आहे. बीडमधील वडवणी येथील सभेमध्ये बोलताना त्यांनी भाजपला आव्हान दिलं आहे. आगामी निवडणुकीमध्ये भाजपचा 48 पैकी एकही खासदार निवडून येऊ देत नाही, असा धमकीवजा इशाराज मनोज जरांगे यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
काय म्हणाले जरांगे?
मी वडवणी मधूनजाहीर आव्हान करतो, तुम्ही मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर यांचे 48 पैकी एकही खासदार निवडून येऊ देत नाही. फडवणीस तुला सांगतो तुझा खासदार आणि आमदार राज्यात निवडून येऊ देणार नाही. दुसरे कुणीही निवडून द्या पंरतु यांचा कोणीही निवडणून येऊ द्यायचा नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडवणीस यांच्यासारखा आणि खुनशी मंत्री मी पाहिला नाही. त्यांच्याकडून बोलणारे सात ते आठ आहेत. सत्ता येत असते जात असते, नका त्रास देऊ. माझी SIT चौकशी सुरू आहे. तुमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत तर होऊद्या. मी सागर बंगल्यावर जाऊन दहा लाख घेऊन जातो. मराठ्यांनी व्यसनापासून लांब रहा, आपली प्रगती कोणीही रोकू शकत नाही. जामनेरचे टंबरेल गिरीश महाजन म्हणतो माझे खूप लाड केले अरे तूच आमचा चहा पेला आणि पोहे खाल्ले, असं मनोज जरांगे म्हणाले.
एकट्या फडणवीसांकडून मराठा समाज वेठीस- जरांगे
एकट्या फडवणीसने समाजवेठीस धरला आहे. पण तुझी गाठ माझ्याशी आहे. 6 कोटी मराठा तुडवून माझ्याकडे यावे लागेल. माझ्या बद्दलचे काही व्हिडीओ तयार करायचे आणि मला बदनाम करायचे. असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. हे व्हिडीओ एडिट केलेले असतात. तुम्हाला जे करायचे ते करा, मला जे करायचे ते मी करेल. पण तुमच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण मिळवेल. फडवणीस यांनी कितीही बदनाम केले समाजापासून हटत पण मी घाबरून तुमच्या बाजूने मेलो तरी येणार नाही. फडवणीस यांची काय नीच वृत्ती आहे, गरीब इमानदार पोरग लढत आहे, तुम्ही पाठ थोपटायला पाहिजे, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.