Manoj Jarange : …तुम्ही त्यावेळी झोपेत होते, मनोज जरांगे यांनी घेतला राज ठाकरे यांचा तिखट समाचार

Manoj Jarange Attack on Raj Thackeray : मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला. लातूर येथून राज ठाकरे यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला. त्यांनी अनेक ज्वलंत विषयाला हात घातला. त्याचवेळी त्यांनी मराठा आरक्षणाची दिशा आणि भविष्यावर मनोज जरांगे यांचे नाव घेत थेट भाष्य केले.

Manoj Jarange : ...तुम्ही त्यावेळी झोपेत होते, मनोज जरांगे यांनी घेतला राज ठाकरे यांचा तिखट समाचार
मनोज जरांगे पाटील, मनसे नेते राज ठाकरे
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 4:07 PM

लोकसभा निवडणुकीच्या काळात राज ठाकरे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात बिनसलं होतं. मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांना अडवू नये, कुणालाही महत्त्व देऊ नये असे आवाहन त्यावेळी केले होते. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लातूर येथून विधानसभा प्रचाराचा नारळ फोडला. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षण का मिळाले नाही याती मीमांसा केली. त्याचवेळी मनोज जरांगे यांचे नाव घेऊन मोठं भाष्य सुद्धा केलं. त्यावर जरांगे पाटील यांनी लागलीच पलटवार केला. बीड जिल्ह्यातील गेवराई येथे त्यांनी राज ठाकरे यांच्यावर तिखट प्रतिक्रिया दिली.

त्यावेळी तुम्ही झोपेत होते…

राज ठाकरे यांच्यावर जरांगे पाटील त्यांनी पलटवार केला. आरक्षण कसे देणार माझ्या सामाजाला माहीत आहे, ते तुम्हाला नाही कळणार. आरक्षण काय आणि लढा टिकवणे काय असते तुम्हाला काय माहीत तुम्हाला अस्तित्व कसे संपवायचे हे तुम्हाला माहित आहे, आणि अस्तित्व कसे टिकवायचे हे माहीत आहे, अशी टीका त्यांनी राज ठाकरे यांच्यावर केली. यावेळी त्यांनी त्या भानगडीत पडू नये, त्यांना मानणारा वर्ग आमचा(मराठा )आहे. मी प्रामाणिक सांगतो त्यांनी या भानगडीत पडू नये. मराठा समाजाचा रोष अंगावर घेऊ नये, अशी माझी त्यांना सूचना आहे. आरक्षण कसे मिळत, ते मी दिले आहे, ते तुम्हाला माहीत नाही, तुम्ही त्या वेळी झोपेत होते, असा खरमरीत टोला जरांगे पाटील यांनी राज यांना लगावला.

हे सुद्धा वाचा

समाजाला आरक्षण मिळणारच

आता पुढेही आरक्षण मिळणार आणि बिना सत्तेचे आरक्षण मिळते, असे जरांगे यांनी ठणकावले. माझा समाज मला संकटात आणायचा नव्हता. लढायचे की नाही लढायचे हे मी आणि माझा समाज बघेल. माझ्या समाजाला काय आवश्यक आहे ते मी करणार आहे. माझा समाज मला मोठा करायचा कसा ते मला बघायचे. मी समाजाचे अस्तित्व खल्लास होऊ देणार नाही. मला समाजात दुफळी होऊ द्यायची नव्हती, आणि ती होऊ दिली नाही. पक्ष काढून त्यांच्या सारखा, माझ्या समाजाला मला तात्पुरता आनंद द्यायचा नव्हता, तात्पुरते समाधान मला त्यांना द्यायचे नव्हते. असे स्पष्ट करत त्यांनी आमची काळजी करू नये असे जरांगे म्हणाले. आता फडणवीस यांनी त्यांच्याकडे ठेका दिला आहे का? अशी घणाघाती टीका सुद्धा जरांगे पाटील यांनी केली.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.