मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाकडून ‘बंद’ची हाक

Manoj Jarange Patil Uposhan : मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी उपोषण करत आहेत. त्यांच्या या आंदोलनाला मराठा समाजाचा पाठिंबा आहे. मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा समाजाने बंदची हाक दिली आहे. आज बीड बंद राहणार आहे. वाचा सविस्तर...

मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाकडून 'बंद'ची हाक
मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलकImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Sep 21, 2024 | 9:59 AM

मराठा समाजारा आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलक सुरु आहे. मागच्या पाच दिवसांपासून जालन्यातील अंतरवली सराटीत ते उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे. मंत्री शंभुराज देसाई आणि मराठा कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यानंतर मनोज जरांगेंनी काल रात्री सलाईन घेतली. त्यांच्या या आंदोलनाला मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे. त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. बीड, धाराशिव, पुण्यात बंदची हाक देण्यात आली आहे.

बीड बंदची हाक

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज बीड बंदची हाक देण्यात आली आहे. जरांगे पाटील मागच्या पाच दिवसांपासून उपोषण करत आहेत.जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलीय. त्यामुळे आज बीड शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आजचा बंद शांततेत पार पडेल असं आश्वासन जरांगे समर्थकांनी दिलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचं जन्म गाव बीड जिल्ह्यात असल्याने पहिला बंद बीडमध्ये पुकारण्यात आला आहे.

बीडमधील परळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलीय. सकल मराठा समाजाकडून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून परळी शहरांमध्ये बंदची फेरी काढणार. आजचा हा बंद शांततेत असणार असल्याचं मराठा समन्वयकांकडून सांगण्यात आलं. बीड जिल्हा मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्याच अनुषंगाने आज जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त असणार आहे.

धाराशिव बंद

सकल मराठा समाजाच्या वतीने आज धाराशिव जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. शासनाच्या निषेधार्थ हा बंद पाळण्यात येणार आहे. सर्वांनी शांततेत बंद पाळावा, असं आवाहन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलं. त्यामुळे आज सकाळपासून धाराशिव शहरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. बहुतांश भागात दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. धाराशिव जिल्ह्यातील बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या संदर्भामध्ये सकल मराठा समाज बांधवाकडून प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे. आज दुपारनंतर मराठा बांधव आंतरवली सराटीकडे जाणार आहेत.

उद्या रविवारी 22 सप्टेंबर पुणे जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सुरु असलेल्या अंतरवाली सराटीतील आमरण उपोषणाला समर्थन देण्यासाठी बंद पुकारण्यात आला आहे. अखंड मराठा समाज पुणे जिल्ह्याच्या वतीने पुणे जिल्हा बंदची हाक देण्यात आलीय.

जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.