बीड : परळीत (Parali) पुन्हा एकदा मुंडे बहीण-भावात शाब्दिक चकमक सुरु झालीय. आपण दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय घेत नाही, असा टोला भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी लगावला होता. त्यावरुन पलटवार करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) पंकजांना खुलं आव्हान दिलंय. पुन्हा एकदा मुंडे बहीण-भावात वार-पलटवार सुरु झालाय. यावेळी धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना ओपन चॅलेंज दिलंय. मी बीडमध्ये MIDC आणली, तुम्ही एक उद्योग तरी आणून दाखवा, अशा शब्दात धनंजय मुंडेंनी आव्हान दिलंय.
विशेष म्हणजे काही दिवसांआधीच, मी दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय घेत नाही, असा टोला पंकजा मुंडेंनी लगावला होता. परळी तालुक्यातल्या इंदपवाडी आणि जीरेवाडीत जलजीवन कामाचं भूमिपूजन धनंजय मुंडेंच्या हस्ते झालं. यावेळी धनंजय मुंडेंनी, पंकजा मुंडेंच्या काळातील भूमीपजूनं आणि वारस्यावरुन डिवचलं.
पंकजांच्या काळात बायपासचं 5 वेळा भूमिपूजन, पण काम नाही, असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावलाय. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंमध्ये शाब्दिक चकमक सुरु झालीय. व्हिलन कोण? म्हणत नाव न घेता, पंकजांनी धनंजय मुंडेंवर टीका केली होती. व्हिलन कोण, पैसे देऊन मतं विकत घेतात, असा घणाघात पंकजांनी केलेला.
बीड आणि विशेषत: परळीचं राजकारण म्हटलं की, धनंजय आणि पंकजा मुंडेंच्याच अवतीभवती फिरतं. त्यामुळं कोणत्या ना कोणत्या कारणावरुन अशी शाब्दिक चकमक सुरुच असते.