Pankaja Munde : केज नगरपंचायतीत पंकजांचा धनंजय मुंडेंना चेकमेट, धनंजय मुंडेंसाठी धोक्याची घंटा?

धनंजय मुंडे यांना चेकमेट देत पंकजा मुंडे यांनी केज नगरपंचायत (Kej Nagarpanchayat Election) काबीज केली आहे.

Pankaja Munde : केज नगरपंचायतीत पंकजांचा धनंजय मुंडेंना चेकमेट, धनंजय मुंडेंसाठी धोक्याची घंटा?
पंकजा मुंडे, धनंजय मुंडे
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 7:04 PM

बीड : बीड मधील मुंडे भावा-बहिणीचा राजकीय वैर आजपर्यंत सर्वांनी पाहिलं आहे. कालच पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला त्यानंतर पंकजा मुंडे यांना बोलताना भान राहत नाही अशी टीका धनंजय मुंडे यांच्याकडून करण्यात आली. हे वार पलटवार नेहमी सुरूच असतात, त्यातच आता पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना चेकमेट दिलाय. धनंजय मुंडे यांना चेकमेट देत पंकजा मुंडे यांनी केज नगरपंचायत (Kej Nagarpanchayat Election) काबीज केली आहे. या नगपंचायतीत जनविकास आघाडीच्या 08 तर राष्ट्रवादी- 05, काँग्रेस- 03, स्वाभिमानी -01 अशा एकूण जागा 17 आहेत. केजमध्ये काँग्रेस आणि जनविकास आघाडी एकत्र येत सत्ता स्थापन करणार आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. इथे पंकजा मुंडे यांनी आपलं गणित जुळवत ही युती केली आहे. जनविकास आघाडी ही भाजप पुरस्कृत आहे, ती काँग्रेसबरोबर सत्तेत बसणार आहे.

पंकजा मुंडेंचं जोरदार कमबॅक

या युतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. या नगरपंचायतीसाठी रजनी पाटील आणि पंकजा मुंडे एकत्र आल्याने या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. बीडच्या राजकारणात ही मोठी उलथापालथ मानली जात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी पंकजा मुंडे यांना धक्का देत परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे निवडून आले त्यानंतर आता पंकजा मुंडे जोरदार कमबॅक करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्या कार्यकर्त्यांच्या रोज गाठीभेटी घेत आहेत त्यांनी बीडमधून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

नगरपंचायत निवडणूक ही स्थानिक लेव्हलला अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक मानली जाते. ज्याच्यात जास्त नगरपंचायती त्याची आमदारकी असं एकंदरीत समीकरण मानलं जातं. त्यामुळे नगरपंचायतीच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष आपली पूर्ण ताकद लावून लढतात. केज ही अत्यंत महत्वाची नगरपंचायत असल्याने धनंजय मुंडे यासाठी ही धोक्याची घंटा तर नाही ना अशा राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. या नगरपंचायत निवडणुकीचा आगामी विधानसभा निवडणुकीवर किती परिणाम होतो? हे येणारा काळच सांगेल.

Tipu Sultan : टिपू सुलतानवरून फडणवीस म्हणातात निर्लजतेचा कळस…तर काँग्रेसने भाजपला दाखवला राष्ट्रपतींचा आरसा

भाजप नेत्यांनी रस्त्याला टिपू सुलतान नाव दिलं, फडणवीस राजीनामा घेणार? अस्लम शेख यांचा सवाल

देश धोक्यात येतोय, देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आलंय, सावध व्हा; नाना पटोलेंचं आवाहन

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.