स्वस्तात सोने देतो म्हणून 40 लाखांची फसवणूनक; पाकिस्तान हद्दीवर परळी पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या

परळी शहरातील एका व्यापाऱ्यास स्वस्तात सोने देतो म्हणून चाळीस लाखांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींच्या परळी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. पाकिस्तान बॉर्डरवर व गुजरातमधील भूज कच्छ या ठिकाणच्या जंगलात जाऊन, जीवावर उदार होत पोलिसांनी मुसक्या आवळून मुद्देमालासह जेरबंद करण्यात आले.

स्वस्तात सोने देतो म्हणून 40 लाखांची फसवणूनक; पाकिस्तान हद्दीवर परळी पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
स्वस्तात सोने देतो म्हणून फसवणाऱ्याना अटक
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 10:50 PM

बीडः परळी शहरातील (Parali Beed) एका व्यापाऱ्यास स्वस्तात सोने देतो म्हणून चाळीस लाखांची फसवणूक (Forty lakh fraud) करणाऱ्या दोन आरोपींच्या परळी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. पाकिस्तान बॉर्डरवर (Pakistan Border) व गुजरातमधील भूज कच्छ या ठिकाणच्या जंगलात जाऊन, जीवावर उदार होत पोलिसांनी मुसक्या आवळून मुद्देमालासह जेरबंद करण्यात आले. अंगावर अक्षरशः शहारे आणणार्‍या या कारवाईमुळे शहर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, 1 वर्षापूर्वी परळी शहरातील व्यापारी शंकर शहाणे यांना गुजरातमधील भूज कच्छ या ठिकाणी राहत असलेला जिसूप मोहम्मद अली कक्कळ आणि सिकंदर भेटले.

यावेळी या दोघांनी सुरुवातीस स्वस्तात सोने देतो म्हणून पाच लाखांचे सोने दिले. यामुळे शंकर शहाणे यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. व्यवहार करतेवेळी जीसूप कक्कळ याने आपले नाव बदलून अब्बास आली अशा नावाचा वापर केला होता.

विश्वास संपादन केला

ठरल्याप्रमाणे जिसूप कक्कळने शंकर शहाणे यांना ठरल्याप्रमाणे पाच लाखांचे सोने दिल्यामुळे त्यांचा त्याच्यावर विश्वास बसला आणि नंतर जिसूप कक्कळने आणखी स्वस्तात सोने देतो म्हणून शंकर शहाणे यांच्याकडून नगदी रोख चाळीस लाख रुपये घेऊन गेला. 40 लाख घेऊन गेल्यानंतर जवळपास सहा महिने जीसूप हा शंकर शहाणे यांना सोने न देता वेळ काढत राहिला.

वर्षापूर्वी शहर पोलीसात तक्रार

कोरोणाचा काळ आहे आज, उद्या सोने देतो म्हणून टोलवाटोलवी करीत राहिला. जिसूप कक्कळ व सिकंदर आपली फसवणूक करीत आहे हे लक्षात येताच शंकर शहाणे यांनी 1 वर्षापूर्वी शहर पोलीसात तक्रार दिली. त्यानंतर याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला.

संबंधित बातम्या 

tv9 Special: राज ठाकरेंवर भूमिका बदलाचे आरोप का होतात? कारण समजून घेण्यासाठी हे पाहावंच लागेल!

Aryan Khan Drugs Case : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात 2 NCB अधिकारी निलंबित, प्रकरण कोणतं वळण घेणार?

NMC Budget | नागपूर मनपाचे नावीन्यपूर्ण 5 उपक्रम कोणते? जाणून घ्या अर्थसंकल्पात वेगळं काय?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.