PHOTO| घारीचा मोरावर गंभीर हल्ला, नागरिकाकडून मायेची सावली, तत्काळ उपचार, डॉक्टरांकडून एक्सरेही काढला
या जखमी मोरावर सर्पराज्ञी केंद्रात उपचार होतील. दरम्यान गोवर्धन दराडे यांच्यामुळे एका पक्ष्याला जीवनदान मिळाल्यानंतर वनविभागाकडून त्यांचं कौतुक करण्यात आलं.
बीडः आपल्या सावजाच्या नकळतच अत्यंत वेगात येऊन झपकन् त्याची शिकार करण्यासाठी घार (Egle attack) ओळखली जाते. बीडमध्ये एका घारीनं अशाच पद्धतीनं मोरावर हल्ला केला. जिल्ह्यातील ढेकनमोहा परिसरात ही घटना घडली. अशा धोक्याची कोणतीही कल्पना नसलेल्या मोरावर घारीनं अचानक हल्ला केला. घारीनं तिच्या चोचींनी मोराला चांगलंच जखमी (Peacock injured) केलं. ढेकनमोहा परिसरातील पसायदान सेवा प्रकल्पाच्या आवारात हा मोर जखमी होऊन पडला. सुदैवाने येथील गोवर्धन दराडे (Govardhan Darade) यांच्या नजरेस ही बाब आली. त्यांनी तातडीने त्याची जखम भरून निघण्यासाठी उपाययोजना केली.
गोवर्धन दराडे यांच्यामुळे जीवदान
घारीच्या हल्ल्यात जखमी झालेला हा मोर पसायदान सेवा प्रकल्पाच्या आवारत पडला होता. येथील गोवर्धन दराडे यांच्या नजरेस हा मोर पडला. त्यांच्या कुटुंबियांनी त्याला सदर परिसरातून उचलून आणले. त्याला कुठे जखमा झाल्या आहेत, हे पाहिले. दराडे यांनी सदरील मोरास घेवून ते एक्सरे काढण्यासाठी साईबाबा हॉस्पीटल याठिकाणी आले होते. त्याठिकाणी डॉ.प्रशांत सानप यांनी मोरोचा एक्सरे काढला. या मोरास वनविभागाचे प्रमुख मुंडे, वनपाल पवार यांच्या स्वाधीन करण्यात आले.
सदरील मोरावर उपचार करण्यासाठी ज्ञानोबा वायबसे व मस्के यांनी सहकार्य केले. या मोरावर उपचार केल्यानंतर या मोरास काही दिवस शिरूर येथील सर्पराज्ञी प्रकल्पाच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.त्यांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधला.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचारांकरिता नेले.
सर्पराज्ञी प्रकल्पात उपचार
बीड जिल्ह्यातील शिरुर कासार येथील सर्पराज्ञी प्रकल्पात या मोरावर उपचार केले जाणार आहे. सर्पराज्ञी केंद्रात जिल्ह्यातील सर्व जखमी पशु तसेच पक्ष्यांवर उपचार केले जातात. उपचार होईपर्यंत या केंद्रातच त्यांना ठेवले जाते.
प्राणी किंवा पक्षी पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याला निसर्गात त्याच्या अधीवासात सोडून दिले जाते. आता या जखमी मोरालावर सर्पराज्ञी केंद्रात उपचार होतील. दरम्यान गोवर्धन दराडे यांच्यामुळे एका पक्ष्याला जीवनदान मिळाल्यानंतर वनविभागाकडून त्यांचं कौतुक करण्यात आलं.
इतर बातम्या-