OBC Reservation : राज्य सरकारने नीट बाजू मांडली असती तर ही वेळ आली नसती, ओबीसी आरक्षणावरून प्रीतम मुंडेंचा हल्लाबोल
माहितीची पूर्तता न केल्यामुळेच आजचा हा दिवस उजाडला आहे. असा गंभीर आरोप खासदार मुंडे यांनी राज्य सरकारवर केला आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या निवडणुका याही ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडल्या आहेत. आता पुन्हा हीच वेळ आल्याने ओबीसी समाजात नाराजी आहे.
मुंबई : राज्यात सध्या हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) आणि मशीदीवरील भोंग्याचा मुद्दा गाजत असताना ओबीसी आरक्षणावरूनही पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण (OBC Reservation) पूर्वरत होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नये अशी मागणी राजकीय पक्षांकडून करण्यात आली होती. मात्र आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका या घ्याव्या लागणार आहेत. यावरून बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी राज्य सारकारबाबत नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने आपली बाजू कोर्टात व्यवस्थित मांडली असती, तर कदाचित हा धक्का बसला नसता असं म्हणत मुंडे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. माहितीची पूर्तता न केल्यामुळेच आजचा हा दिवस उजाडला आहे. असा गंभीर आरोप खासदार मुंडे यांनी राज्य सरकारवर केला आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या निवडणुका याही ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडल्या आहेत. आता पुन्हा हीच वेळ आल्याने ओबीसी समाजात नाराजी आहे.
आता तरी सरकार काय करणार?
तर पंकजा मुंडे यांनीही यावरून टीका केली आहे. मी मागे आसे म्हटले होते की ओबीसी आरक्षणाला धोका आहे आणि आज ते खरे ठरले आहेय. राज्य सरकारने आपली बाजू पूर्णपणे मांडली नाही. त्यामुळे कोर्टाने हा निर्णय घेतला आहे. माझी मागणी आहे की ओबीसी आरक्षणाशीवाय निवडणूका व्हायला नको.राज्य सरकारने राज्यापुरता निर्णय घ्यावा आणि नंतरच निवडणूका घ्याव्या. आशी माझी सरकारला विनंती आहे. तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का नसून हा धोका आहे असेही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. तर आलेला निर्णय प्रचंड निराशाजनक आहे, कारण ओबीसी आरक्षणाची बाजू मांडायला कमी पडलो, हेच सत्य आहे. आता तरी राज्य सरकार काही करणार आहे का ? असे सवालही त्यांनी केला आहे.
गुन्हेगारीचा पाढा वाचून दाखवला
तर बीडमधली कायदा आणि सुव्यवस्थेवरूनही त्यांनी हल्लाबोल केला आहे. बीड जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यापासून कायदा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. खून, दरोडे, बलात्कार आणि हाणामाऱ्यामुळे बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यस्था बिघडल्याचा आरोप खासदार प्रीतम मुंडे यांनी केला आहे. महिलांच्या सुरक्षेसंदर्भात त्यांनी बीडच्या प्रभारी पोलीस अधीक्षक पंकजा देशमुख यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार प्रीतम मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या गुन्हेगारीबद्दल पाढा वाचून दाखविला .