आम्ही शिवसैनिक आमची अक्कल गुडघ्यात, आम्ही काहीही करू शकतो; खैरेंचा नवनीत राणांना इशारा

नवनीत राणा यांच्यावर टिका करताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची जीभ घसरल्याची पहायला मिळाले, त्यांनी नवनीत राणा यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला

आम्ही शिवसैनिक आमची अक्कल गुडघ्यात, आम्ही काहीही करू शकतो; खैरेंचा नवनीत राणांना इशारा
चंद्रकांत खैरे
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 6:06 PM

बीड : राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. यातून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. हनुमान चालीसेवरून शिवसेना (Shiv Sena) आणि राणा दाम्पत्य हे आमने-सामने आल्याचे पहायला मिळाले. दरम्यान आता या वादात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी देखील उडी घेतली आहे, त्यांनी नवनीत राणा (Navneet Rana) यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली आहे. बीडमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे उपस्थित होते. बैठकीनंतर त्यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधाला आहे. ती बाई काहीही बोलते, आम्ही शिवसैनिक आमची अक्कल गुडघ्यामध्ये असते, आम्ही काहीही करू शकतो. आता सहन होत नाही. उद्धव ठाकरे हे आमचे दैवत आहेत. त्यांना कोणी काही बोलले तर आम्ही सहन करणार नाही असा इशारा खैरे यांनी दिला आहे. तसेच नवनीत राणा यांनी जातीचे खोटे सर्टिफिकेट सादर केल्याचा आरोप देखील खैरे यांनी केला आहे.

खैरे नेमकं काय म्हणाले?

यावेळी बोलताना खौरे यांनी नवनीत राणा यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ती बाई काहीही बोलते, आम्ही शिवसैनिक आमची अक्कल गुडघ्यामध्ये असते, आम्ही काहीही करू शकतो. आता सहन होत नाही. उद्धव ठाकरे हे आमचे दैवत आहेत. त्यांना कोणी काही बोलले तर आम्ही सहन करणार नाही असा इशारा खैरे यांनी दिला आहे. पुढे बोलताना खैरे म्हणाले की, ती बाई काय होती, कोण होती हे मला सर्व माहीत आहे, आधी राष्ट्रवादीने सपोर्ट केला आता भाजप सपोर्ट करत आहे. ही बाई म्हणजे पक्ष बदलणारी बाई असल्याची टीका खैरे यांनी केली आहे.

भाजपावर टीका

दरम्यान यावेळी त्यांनी भाजपावर देखील टीका केली आहे, भाजपाची पातळी घसरल्याचे त्यांनी म्हटले आहे, आमचे जुने मित्र माजी मुख्यमंत्री आहेत ते फक्त भाषण करतात. भाजपाकडून शिवसेनेवर खालच्या स्थरावर टीका केली जाते. उद्धव साहेबांना शांतपणे कार्य करू द्या. महाराष्ट्र एक नंबरवर आणण्याचा उद्धव साहेबांचा प्रयत्न आहे. मात्र तिथे ते खोडा घालण्याचा प्रयत्न करतात. लोकांना मिसगाईड करण्याचे काम माजी मुख्यमंत्री करत असल्याचे म्हणते त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.