सहा खाती आहेत ना तुमच्याकडं, एखादं खातं कमी करा; सुषमा अंधारे यांनी या मंत्र्यांना केली मागणी, कारण काय?

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझं काही वैर नाही. अनिल देशमुख यांची चौकशी सुरू झाली तेव्हा त्यांनी आपला राजीनामा दिला होता. त्यावेळी देशमुख हे गृहमंत्री होते.

सहा खाती आहेत ना तुमच्याकडं, एखादं खातं कमी करा; सुषमा अंधारे यांनी या मंत्र्यांना केली मागणी, कारण काय?
Follow us
| Updated on: Mar 18, 2023 | 3:56 PM

बीड : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल आणि फसवणूक प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. अमृता फडणवीस यांना फसवण्याचा प्रयत्न करणारी अनिक्षा जयसिंघानी हिचे वडील आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो समोर आले. यावर बोलताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझं काही वैर नाही. अनिल देशमुख यांची चौकशी सुरू झाली तेव्हा त्यांनी आपला राजीनामा दिला होता. त्यावेळी देशमुख हे गृहमंत्री होते. आता प्रकरण गृहमंत्र्यांच्या पत्नीशी संबंधित आहे. हे प्रकरण २०१६ पासून सुरू आहे. २०१४ ते २०१९ च्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यांच्या पत्नीच्या संबंधाने प्रयत्न सुरू आहे. नैतिकता म्हणून तपास करू द्या. ज्या खात्यात चौकशी सुरू आहे त्या खात्याचे प्रमुख फडणवीस आहेत. तर चौकशी प्रभावित होणार नाही हे कशावरून? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.

निष्पक्ष तपासासाठी हे करा

चौकशी निष्पक्ष होईल, याचा पुरावा काय आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमचे मित्र सामिल आहेत. मग, ते मित्र कोण हे त्यांनी सांगितलं पाहिजे, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या. या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासासाठी देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे. सहा खाती आहेत ना तुमच्याकडं एखादं खातं कमी करा ना. जरा बाजूला राहा. अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. त्या बीडमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या.

हे सुद्धा वाचा

त्यावेळी हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते

मुख्यमंत्री म्हणतात, जयसिंघानी हा सर्व पक्ष फिरून आलेला माणूस आहे. भाजपकडून एक फोटो ट्वीट केला गेला. हा फोटो उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा आहे. जयसिंघानी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा व्यक्ती उल्हासनगरमध्ये राहतो. तेव्हा एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते.

त्यावेळी मातोश्रीवर जिल्हाप्रमुखांच्या परवानगीशिवाय जाऊ शकत नव्हते. मित्र म्हणून फडणवीस यांनी शिंदे यांच्याकडे इशारा दिला आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. श्रीकांत शिंदे यांचे गोलमैदानावर ऑफिस आहे. या मैदानावरची जागा कुणाची आहे. याचीही चौकशी व्हावी, या गोष्टीही पुढं याव्यात, अशी मागणीही सुषमा अंधारे यांनी केली. यातून कुणाची किती सलगी आहे, ते कळेल, असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं.

याची चौकशी झाली पाहिजे

उद्धव ठाकरे यांच्यासोबत जयसिंघानी यांचा फोटो भाजपने ट्वीट केला. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी मात्र याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. कारण ज्यावेळी जयसिंघानी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. त्यावेळी त्यांच्या उल्हासनगर भागातून आले होते. त्याचे अध्यक्ष हे एकनाथ शिंदे होते.

मातोश्रीमध्ये जर एखाद्या शिवसैनिकाला उद्धव ठाकरे यांची भेट त्यावेळी घ्यावी लागत असेल तर त्यावेळी जोपर्यंत जिल्हाध्यक्षांचं कन्फर्मेशन लागत होतं. तोपर्यंत त्यांना प्रवेश मिळत नव्हता. याचा अर्थ एकनाथ शिंदे यांनीच जयसिंघानी यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट घालून दिली होती का? याची पण चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....