तपास आता कुठंतरी रुळावर…,वाल्मिक कराडला मकोका लागल्यानंतर अंजली दमानिया यांची मोठी प्रतिक्रिया, परळी बंदवर काय म्हणाल्या
Walmik Karad Mococa, Anjali Damania Reaction : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आज वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आला. त्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशी प्रतिक्रिया दिली.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आज वाल्मिक करडला मकोका लावण्यात आला. याप्रकरणात बीड जिल्ह्यातील विरोधक आणि सत्ताधारी आमदारांनी रान पेटवले. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. तर आज वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर अवघ्या दहा मिनिटातच परळी बंदची हाक देण्यात आली. पटापट दुकाने व आस्थापन बंद झाली. त्यावर दमानिया यांनी तिखट प्रतिक्रिया दिली.
तपासाची गाडी रूळावर…
आज बातमी चालवण्यात आली की वाल्मीक कराडला मकोका लागला आहे. वाल्मीक कराडला मकोका कोर्टासमोर सादर करण्यात येते हे ऐकून बरं वाटलं. आता तपासाची गाडी कुठेतरी रुळावर येईल. तपासाची दिशा योग्य दिशेला जाईल. खंडणी आणि संतोष देशमुख यांचा खून हे काही वेगळे नाही. ही दोन्ही प्रकरण वेगळी नाहीत मकोका लागल्याने या सर्व गोष्टी स्पष्ट होतील, अशी प्रतिक्रिया दमानिया यांनी दिली.
हे प्रकरण अतिशय गंभीर आहे, राजकारणाचा गुन्हेगारीकरण झाले त्यावर आळा घालण्याची आता गरज आहे. या प्रकरणात कशी त्याची दिशा बदलतील, कशा पळवाटा काढतील हे समोर येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
अन् व्यक्त केली शंका
संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळायला हवा… या प्रकरणात खरं तर पटपट कारवाई व्हायला हवी होती परंतु प्रत्येक कारवाईत वेळ लागला आहे. प्रत्येक कारवाईत 20 – 20 दिवस गॅप ठेवलाय त्याच्यामुळे किती पुरावे नष्ट केले असतील, अशी शंका पण त्यांनी व्यक्त केली. एसआयटी संदर्भात अधिकारी बदलले नंतर पुन्हा एसआयटी नवीन बनवण्यात आली. ज्या आता घटना घडतात त्यामुळे वाटतंय की तपास योग्य दिशेने जात असल्याचे दिसते, असे त्या म्हणाल्या.
हा योगायोग नक्कीच नाही
30 डिसेंबर रोजी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यानंतर वाल्मीक कराड शरण आला हा काही योगायोग नाही. खंडणी आणि देशमुख यांची हत्या ही दोन प्रकरण वेगवेगळी नाही ती प्रकरण एकच आहेत. मे महिन्यापासून मी काही गोष्टी सांगत होते परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्याचवेळी मकोका लावण्यात आला असता तर आता संतोष देशमुख जिवंत असते. अजून देखील माझी मागणी आहे की धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं पाहिजे, असे दमानिया म्हणाल्या.
वाल्मिक कराडच्या टोळीने केले परळी बंद
वाल्मीक कराड यांच्या आईना मी ट्विटद्वारे संदेश देण्याचा प्रयत्न केला. आई तुम्ही खूप भोळे आहात तुम्हाला सत्य परिस्थिती माहिती नाही… यांची दहशत किती आहे याची तुम्हाला माहिती नसेल. तुमचा नातू देखील किती मोठमोठ्या गाड्या फिरवतो काही गोष्टी हे त्यांना विचारण्याचा प्रयत्न करायला हवा होता, असे त्या म्हणाल्या. जो परळी बंद करण्याचा निर्णय झाला आहे. तो उत्स्फूर्तपणे नाही तर वाल्मीक कराडच्या टोळीने केला आहे, अशी तिखट प्रतिक्रिया दमानिया यांनी दिली.