Beed Accident | ट्रक घाटात पलटी 2 जण जखमी, बीडचा धारूर घाट बनला मृत्यूचा सापळा!
धारूर घाटात आत्तापर्यंत 13 जणांचा मृत्यू झालाय. घाट अरुंद असल्याने त्याची रुंदी वाढवण्याची मागणी वारंवार केली जातेय. मात्र संबंधित प्रशासनाचे अद्याप या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे. धारूचा घाट चार किलोमीटरचा असून या घाटात दोन दिवसाआड अपघात नित्यनेमाचे झाले आहेत.
बीड : बीडचा (Beed) धारूर घाट मृत्यूचा सापळा बनलाय. मध्यरात्री साखर आणि सरकी घेऊन जाणारा ट्रक घाटात पलटी झालाय. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. अपघातामध्ये चालकासह क्लीनर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदरील घाट हा अरुंद असल्याने या घाटात वर्षभरात जवळपास 82 अपघात झालेत. ही आकडेवारी अत्यंत धक्कादायक (Shocking) आहे. या घाटात जास्त करून रात्रीच्या वेळी अपघात होण्याच्या घटना घडतायंत.
धारूर घाटात आत्तापर्यंत 13 जणांचा मृत्यू
धारूर घाटात आत्तापर्यंत 13 जणांचा मृत्यू झालाय. घाट अरुंद असल्याने त्याची रुंदी वाढवण्याची मागणी वारंवार केली जातेय. मात्र संबंधित प्रशासनाचे अद्याप या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे. धारूचा घाट चार किलोमीटरचा असून या घाटात दोन दिवसाआड अपघात नित्यनेमाचे झाले आहेत. त्यामुळे या मार्गावरील अपघात रोखायचे असतील तर प्रशासनाने वेळीच दखल घेणं गरजेचं आहे.
वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण
धारूरच्या घाटातील अपघाताचे सत्र कधी थांबणार असा प्रश्न आता सर्वसामान्यांकडून विचारला जातोयं. वर्षभरात तब्बल 82 अपघात या घाटात झाल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून घाटातील रस्त्यांची रूंदी वाढवण्याची मागणी जोर धरू लागलीयं. मात्र, प्रशासन याकडे अजिबात लक्ष देत नाही. यामुळे अपघातांचे सत्र कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित होतोयं.