बीडमध्ये विद्युत प्रवाह घरात उतरला, महावितरणचा भोंगळ कारभार दोन भावंडांच्या जीवावर बेतला

घराशेजारीच विद्युत पोल आहे आणि अनेक वेळा विद्युत प्रवाह उतरत होता. महावितरण विभागाला याची तक्रार देखील करण्यात आली होती. मात्र महावितरणच्या हलगर्जीपणामुळे आज दोन चिमुकल्यांवर जीव गमावण्याची वेळ आली आहे. घराच्या छतावर खेळत असताना या भावंडांना वीजेचा शॉक (Electric Shock) लागून त्यांचा मृत्यू झाला.

बीडमध्ये विद्युत प्रवाह घरात उतरला, महावितरणचा भोंगळ कारभार दोन भावंडांच्या जीवावर बेतला
महावितरणचा भोंगळ कारभार दोन भावंडांच्या जीवावर बेतलाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 11:57 PM

बीड : विद्युत प्रवाह घरात उतरून झालेल्या दुर्घटनेत दोन सख्या चुलत भावंडां (Sibling)चा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. घटना बीडच्या माजलगाव तालुक्यातील टालेवाडी या गावात घडलीय. साक्षी भरत बडे (12) आणि सार्थक अशोक बडे (9) अशी मृत भावंडांची नावे आहेत. घराशेजारीच विद्युत पोल आहे आणि अनेक वेळा विद्युत प्रवाह उतरत होता. महावितरण विभागाला याची तक्रार देखील करण्यात आली होती. मात्र महावितरणच्या हलगर्जीपणामुळे आज दोन चिमुकल्यांवर जीव गमावण्याची वेळ आली आहे. घराच्या छतावर खेळत असताना या भावंडांना वीजेचा शॉक (Electric Shock) लागून त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडित कुटुंबाने केली आहे. (Two siblings died in Beed due to electric shock)

इगतपुरीत उंचावरुन पडून दोन कामगारांचा मृत्यू

पत्र्याचे काम करीत असताना पत्रा तुटून खाली पडल्याने दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे येथील कंपनीत घडली आहे. मोहम्मद सानू खान (28), मोहम्मद अनास (21) अशी पडून मृत्यू झालेल्या दोन कामगारांची नावे असून दोघेही उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतेदह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

भंडाऱ्यात पोहायला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

सकाळच्या सत्रातील शाळा सुटल्यानंतर मित्रांसोबत नाल्यावर पोहायला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली लगतच्या सेंदुरवाफा येथे उघडकीस आली आहे. शोध मोहिमेनंतर रात्री उशिरा मुलांचे मृतदेह सापडले. धवल रामू परशुरामकर (11), भावेश अशोक भोंडे (11), अशी मृत विद्यार्थ्यांची नाव आहेत. दोघेही नवजीवन कॉन्व्हेंटमध्ये पाचव्या वर्गात शिकत होते. शुक्रवारी सकाळच्या सत्रातील शाळेत धवल सायकलने गेला होता. सकाळी 11 वाजले तरी तो घरी परत आला नाही. त्यामुळे त्याचा शोध सुरू झाला. काही वेळात प्रगती कॉलनीजवळ असलेल्या नाल्याजवळ एक सायकल असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पालकांसह पोलिसांनी तेथे धाव घेतली. शोधमोहीम राबविली असता रात्री उशिरा धवल व भावेशचा मृतदेह आढळून आल. विशेष म्हणजे दोघे बुडत असल्याचे पाहून मित्र तेथून पळून गेले होते. त्यामुळे कुणालाही सायंकाळपर्यंत घटनेची माहिती मिळाली नव्हती. अखेर उशिरा शोध मोहिमेनंतर मृतदेह आढळले. (Two siblings died in Beed due to electric shock)

इतर बातम्या

Baramati Crime : बारामतीत अर्धवट अवस्थेत पुरुषाचा मृतदेह आढळला; आत्महता की घातपात ? याबाबत तपास सुरु

Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांशी मुंबई पोलिसांचं अनोखं नातं; आठवड्यातून दोनवेळा करणार विचारपूस

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.