पेट्रोल न दिल्याच्या रागातून पेट्रल पंपाची तोडफोड; माजलगावमधील धक्कादायक घटना
बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणाकडून एका पेट्रोल पंपाची तोडफोड करण्यात आली आहे. तोडफोड करतानाची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पेट्रोल न दिल्याच्या रागातून ही तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
बीड : जिल्ह्यातील माजलगाव (Majalgaon) शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणाकडून एका पेट्रोल पंपाची तोडफोड (Petrol pump vandalism) करण्यात आली आहे. तोडफोड करतानाची ही घटना सीसीटीव्ही (cctv) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पेट्रोल न दिल्याच्या रागातून ही तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मध्यरात्री पेट्रोल पंप बंद झाल्यानंतर दोन तरुण पेट्रोल भरण्यासाठी दुचाकीवरून संबंधित पेट्रोल पंपावर आले. त्यांनी वाहानात पेट्रोल भरण्यासाठी सांगितले. मात्र पेट्रोल पंप बंद झाल्याने कर्मचाऱ्यांनी पेट्रोल देण्यास नकार दिला. पेट्रोल देण्यास नकार दिल्याने तरुणाला राग अणावर झाला. त्यातील एक तरुणाने पेट्रोल पंपावर तोडफोड केली. हा सर्व प्रकार तेथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. मात्र या तरुणांचे नाव अद्याप समोर येऊ शकलेले नाही.
पेट्रोल न दिल्यामुळे वाद
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, माजगाव शहरामध्ये एका पेट्रोल पंपावर दोन तरुण मध्यरात्री पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. मात्र पेट्र्ल पंप बंद झाल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी पेट्रोल देण्यास नकार दिला. पेट्रोल का दिले नाही अशी विचारणा करत त्यातील एका तरुणांने पेट्रोल पंपाची तोडफोड केली. थोड्यावेळाने ते तरुण घटनास्थळावरून निघून गेले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
तोडफोडीत पेट्रोल पंपाचे नुकसान
दरम्यान या प्रकरणातील तरुणांची ओळख अद्याप समोर येऊ शकलेली नाहीये. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. घटनेनंतर हे दोनही तरुण घटनास्थळावरून निघून गेले. या घटनेमध्ये पेट्रोलपंपाचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित तरुणाने पेट्रोल भरायच्या नळीने मशीनची तोडफोड केली.
संबंधित बातम्या
Bhandara | शिकारीसाठी गेले आणि वनविभागाच्या जाळ्यात आले, भंडाऱ्यात चौदा जणांवर कारवाई
पोलीस दाम्पत्याचं घरगुती भांडण विकोपाला गेलं, महिलेने जीवनच संपवलं; गडचिरोलीतील मन सुन्न करणारी घटना