अशावेळी तुम्ही खासदार म्हणून काय करता?, धनंजय मुंडे यांचा निशाणा कुणावर

जलजीवन योजनेच्या जास्त योजना जिल्ह्यात व्हाव्यात म्हणून पालकमंत्री असताना आराखडा तयार केला. तुमचं थोडसं योगदान दाखवा.

अशावेळी तुम्ही खासदार म्हणून काय करता?, धनंजय मुंडे यांचा निशाणा कुणावर
Follow us
| Updated on: Mar 12, 2023 | 1:28 PM

परळी : अधिवेशनातील कामकाज पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे सध्या परळी विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी परळीतील टोकवाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत कामाचं भूमिपूजन केलं. या दरम्यान धनंजय मुंडे यांचे टोकवाडी ग्रामस्थांच्या वतीने दोन जेसीबींवरून फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत झाले आहे. यावेळी झालेल्या भाषणात पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनी आपल्या दोन्ही बहिणींवर निशाणा साधला आहे. खासदार असताना देखील परळी वैद्यनाथ मंदिराचं नाव तुम्हाला कायम राखता आला नाही. सध्या परळीतील वैद्यनाथ हे ज्योतिर्लिंग नसून छत्तीसगड येथील वैद्यनाथाला ज्योतिर्लिंगाचा दर्जा मिळाला आहे. मग अशा वेळी तुम्ही खासदार म्हणून काय करता, असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.

कारखान्यासाठी १६ कोटी रुपये दिले

वैद्यनाथ कारखान्यावरून देखील धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय. महाविकास आघाडी सरकार असताना तुमच्या कारखान्याला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 16 कोटी रुपये दिले. याला आम्ही विरोध केला नाही. असं म्हणत या दोन्ही मुंडे बहिणींवर धनंजय मुंडे यांनी टीकास्त्र डागले आहे. धनंजय मुंडे म्हणाले, कारखान्याची परिस्थिती काय आहे हे मला माहीत होती. कारखान्याचा संचालक माझ्या विरोधातला असला तरी ऊस कारखाना चालला पाहिजे, यासाठी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी १६ कोटी रुपये दिले.

हे सुद्धा वाचा

अंबाजोगाईला ऊसाचं गाळप केलं

मागच्या वर्षी शेतकऱ्यांचा ऊस जात नव्हता. अंबाजोगाईचा बंद पडलेला कारखाना सुरू केला. ५५ वर्षांपूर्वीची ती मशिनरी होती. ती भाड्याने घेतली. मागच्या वर्षी सव्वादोन लाख टन अतिरिक्त ऊस होता. त्याल दोन हजार रुपये भाव दिला. यावर्षीसुद्धा एक लाख ६५ हजार टन उसाचं गाळप केलं. वैद्यनाथचा ऊस कारखाना बंद होता. सव्वालाख टन ऊस अंबाजोगाईला नेऊन गाळलं. शेतकऱ्यांना त्याचं पेमेंट केलं, असंही धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

खासदारांनी काही प्रयत्न केले नाही

जलजीवन योजनेच्या जास्त योजना जिल्ह्यात व्हाव्यात म्हणून पालकमंत्री असताना आराखडा तयार केला. तुमचं थोडसं योगदान दाखवा. येथील खासदार एखाचं टेंडर आपल्या माणसाला मिळावं, म्हणून सीईओंच्या चेंबरला जातात. पण, परळी वैजनाथच्या ज्योतिर्लिंगासाठी खासदार असताना काही प्रयत्न केले नाही. परळीचं ज्योतिर्लिंग आता छत्तीसगडला गेलं. सात वर्षांपूर्वी पळवून नेण्यात आलं. परळीचं ज्योतिर्लिंग छत्तीसगचं मानलं जातं.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....