ईडने नेण्याआधी संजय राऊतांच्या आईने केले त्यांचे औक्षण; ED ने ताब्यात घेण्याआधीचा Exclusive Video
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या मातोश्री सविता राऊत यांनी संजय राऊत यांना ताब्यात घेतलं त्यावेळेस ते जेव्हा निघाले होते घरातला हा व्हिडिओ आहे. संजय राऊत यांचं त्यांच्या मातोश्री सविता राऊत यांनी औक्षण केलं. त्यानंतर आई आणि मुलाचे भावनिक क्षण पहायला मिळाले. राऊतांनी आईच्या पाया पडून आशिर्वाद घेतले.
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊतांवर ईडीची कारवाई झालेय. रविवारी सकाळी सात वाजता ईडीच्या पथकाने संजय राऊतांच्या विक्रोळी येथील निवासस्थानी धाड टाकली. तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने पत्रा चाळ प्रकरणी राऊतांना ताब्यात घेतले(Sanjay Raut In ED Custody).ईडीने संजय राऊतांना ताब्यात घेण्याआधीचा त्यांच्या घरातील एक व्हिडिओ समोर आला. ED ने संजय राऊतांना ताब्यात घेण्याआधीचा हा व्हिडिओ आहे. या Exclusive Video मध्ये संजय राऊत यांच्या मातोश्री त्यांचे औक्षण करताना दिसत आहेत. राऊतांच्या मातोश्रीसह त्यांची पत्नी, मुलगी तसेच कुटूंबातील इतर सदस्य भावूक झाल्याचे दिसत आहेत.
ईडने संजय राऊतां नेण्याआधीचा भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
हा एक मायेचा क्षण आहे. राऊतांचे कुटुंब त्यांच्या पाठीशी आहे. ईडीने राऊतांना नेताना कुटुंबीय भाऊक झाले होते. या व्हिडिओत राऊत यांच्या आई सविता राऊत भाऊक झालेल्या दिसत आहेत. संजय राऊत ईडी पथकासह घराहाबेर पडले तेव्हा त्यांच्या आई या खिडकीत आलेल्या होत्या.
पाया पडून आईचे आशिर्वाद घेतले
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या मातोश्री सविता राऊत यांनी संजय राऊत यांना ताब्यात घेतलं त्यावेळेस ते जेव्हा निघाले होते घरातला हा व्हिडिओ आहे. संजय राऊत यांचं त्यांच्या मातोश्री सविता राऊत यांनी औक्षण केलं. त्यानंतर आई आणि मुलाचे भावनिक क्षण पहायला मिळाले. राऊतांनी आईच्या पाया पडून आशिर्वाद घेतले.
मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही – संजय राऊत
संजय राऊत वारंवार म्हणतात की त्यांच्यावर राजकीय सूड बुद्धीने कारवाई झाली आहे. कोणत्याही मोठ्या कारवाईला सामोरे जायला तयार आहे. पक्षासाठी कोणताही त्याग करायला तयार आहे. मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही असे संजय राऊत म्हणाले.
राऊतांच्या घरात सापडली 11 लाख 50 हजारांची रोकड
ईडीच्या चौकशी दरम्यान राऊतांच्या घरात 11 लाख 50 हजारांची रोकड सापडली आहे. नोटांच्या बंडलवर अयोध्या असं लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. यातील दीड लाख कुटुंबीयांचे आहेत अशी माहिती राऊत कुटुंबीयांनी दिली आहे.