लहान मुलांच्या हाती वाहन सोपविणाऱ्या पालकांनो सावधान, इतका होणार दंड आणि इतकी वर्षे लायसन्स आता विसरा

बहुतांशी दुचाकी चालकांचे अपघाती मृत्यू हे वाहन चालवितांना हेल्मेट न घातल्यामुळे आणि डोक्यास इजा झाल्याने झाले आहेत. ही बाब रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अतिशय चिंताजनक आहे.

लहान मुलांच्या हाती वाहन सोपविणाऱ्या पालकांनो सावधान, इतका होणार दंड आणि इतकी वर्षे लायसन्स आता विसरा
bike crashImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 9:53 PM

मुंबई : देशात आणि राज्यात दुचाकी वाहन ( Two Wheeler ) चालकांच्या अपघातांचे तसेच अपघाती मृत्यूंचे प्रमाण सर्वात जास्त आहे. त्यामुळे हे अपघात कमी करण्याच्या दुष्टीने संपूर्ण राज्यात चालकांचे रस्ता सुरक्षा आणि कायदेशीर तरतूदींबाबत समुदेशन ( Counselling ) करण्यात येणार आहे. त्यानूसार दुचाकी वाहन चालकांसाठी मोटार वाहन कायद्यात ज्या तरतुदी आहेत त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानूसार 18 वर्षांखालील ( Juveniles ) मुलांच्या हातात आपल्या गाडीची चावी देणाऱ्या पालकांनी यापुढे सावध व्हावे असाच निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. काय आहे नेमका निर्णय पाहूया…

रस्ते अपघातात देशात दरवर्षी जवळपास 1.50 लाख जणांचा मृत्यू होतो तर महाराष्ट्रात सुमारे 15000 व्यक्ती रस्ते वाहन अपघातांमध्ये आपला जीव गमावतात. रस्ते कमवती व्यक्ती नाहीशी झाल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडते. तसेच अपघातांमुळे कायमचे अपंगत्व येते त्यामुळे नुकसान होते. वाहन अपघातात दुचाकी चालकांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. राज्यात जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत झालेल्या एकूण अपघातांपैकी 51 % पेक्षा अधिक अपघात दुचाकी चालकांचे झालेले आहेत, त्यामध्ये 7700 लोक मृत्यूमुखी पडले आहेत.

समुदेशन करण्याचा निर्णय

दुचाकी वाहनांच्या अपघातांचा अभ्यास केल्यानंतर निदर्शनास येते की, बहुतांशी दुचाकी चालकांचे अपघाती मृत्यू हे वाहन चालवितांना हेल्मेट न घातल्यामुळे आणि डोक्यास इजा झाल्याने झाले आहेत. ही बाब रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे मोटार वाहन कायद्यातील तरतूदीबाबत पालकांना सजग करुन त्यांचे समुदेशन करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे.

अशी आहे कायद्यात तरतूद

लायसन्स नसलेल्या अल्पवयीन मुलांना दुचाकी चालविण्यापासून प्रतिबंध करण्यात येणार आहे. या मुलांच्या पालकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. तरीही नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर मोटार वाहन कायदा 1988 – कलम 180, 181, 199 (अ) अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी ( Juveniles ) मोटार सायकल अथवा इतर वाहन चालविल्यास पालकांवर मोटार वाहन कायदा 1988 – कलम 199 ( अ ) अंतर्गत रु.25,000/- दंडाच्या शिक्षेची तरतूद असून अशा मुलांना वयाच्या 25 वर्षांपर्यंत लायसन्स मिळणार नाही अशी कायद्यात तरतूद आहे.

18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनो सावधान

मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 4 अंतर्गत 18 वर्षाखालील कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहन चालवु नये. परंतु 50 सीसी पेक्षा कमी इंजिन क्षमता असलेली दुचाकी वयाच्या 16 वर्षानंतर चालवू शकतात. कलम 18 च्या तरतुदींनूसार 20 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाहतुक वाहन चालवू नये.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.