उल्का, वादळ पडलं तरी आमच्याकडे द्या, भुजबळांचंही असंच; राज्यपालांची नाशिकमध्ये टोलेबाजी

राज्यपाल म्हणाले की, महाराष्ट्र आणि उत्तराखंडमधील लोग सारखे आहेत. मेहनती आहेत. उत्तराखंडमधील लोक मजुरी करू शकतात. महाराष्ट्रातील लोक शेती करतात. द्राक्ष कांदे पिकवतात. मुली शिक्षणात पुढे आहेत, पण चेंबरच्या कार्यक्रमात महिला दिसत नाहीत. महिलांना उद्योगात स्थान द्या, असे आवाहन त्यांनी केले.

उल्का, वादळ पडलं तरी आमच्याकडे द्या, भुजबळांचंही असंच; राज्यपालांची नाशिकमध्ये टोलेबाजी
भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल.
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 2:02 PM

नाशिकः उल्का, वादळ पडलं तरी आमच्याकडे द्या, असं भुजबळबांचं असतं म्हणत राज्यपालांनी शनिवारी नाशिकमध्ये जोरदार टोलेबाजी केली. राज्यपाल (Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) नाशिक दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या उपस्थिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरच्या सुवर्ण महोत्सवाचा समारंभ पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळही (Chhagan Bhujbal) उपस्थित होते. राज्यपालांच्या उपस्थितीत इतरही कार्यक्रम होणार आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, छगन भुजबळांनी नाशिकसाठी अनेक मागण्यात केल्या. मला उत्तराखंडचा एक जुना लोकप्रतिनिधी आठवला. तो म्हणायचा जे व्हायला हवं, ते माझ्याच मतदारसंघात व्हावं. आम्ही म्हणायचो हा उल्का, वादळ पडलं तरी आमच्याकडे द्या म्हणेल. भुजबळांचे देखील असंच आहे. राज्यपाल पुढे म्हणाले की, येथे त्र्यंबकेश्वराची कृपा आहे. त्यामुळे रामाला पुन्हा वनवासाला येण्याची गरज राहणार नाही. भगतसिंहला राज्यपाल म्हणूनच यावे लागेल. राज्यपाल म्हणून आलो, तर कुटुंबासह येण्याची गरज नाही. (भुजबळ यांनी राज्यपाल यांना कुटुंबासह नशिकमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यांना राज्यपालांनी असा टोला हाणला.) बुद्धाचे नाव त्याग तपचर्येसाठी घेतले जाते. राजकारणात दोन प्रकारचे लोक असतात. एक आहे की दुसरे कोणी पुढे जाऊ नये असे असतात, तर दुसरे आपल्यापेक्षा आपले कार्यकर्ते पुढे जावे अशी इच्छा ठेवतात. सगळ्यांना बरोबर घेऊन काम केले तर सबका साथ सबका विकास होगा.

महिलांना स्थान द्या…

राज्यपाल म्हणाले की, महाराष्ट्र आणि उत्तराखंडमधील लोग सारखे आहेत. मेहनती आहेत. उत्तराखंडमधील लोक मजुरी करू शकतात. महाराष्ट्रातील लोक शेती करतात. द्राक्ष, कांदे पिकवतात. मुली शिक्षणात पुढे आहेत, पण चेंबरच्या कार्यक्रमात महिला दिसत नाहीत. महिलांना उद्योगात स्थान द्या, असे आवाहन त्यांनी केले. भुजबळ बसले आहेत. त्यांनी संघर्ष केलाय त्यामुळे त्यांना दुःखे समजतात, असा उल्लेखही त्यांनी केला.

माझ्यावर देखील त्यांचं प्रेम…

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, राज्यपालांचे नाशिकवर प्रेम आहे. नाशिकच्या कार्यक्रमाला बोलावलं की, ते नक्की येतात. माझ्यावर देखील त्यांचं प्रेम आहे, पण राजकारणात ते माझं ऐकत नाहीत. राजकारण एकीकडे, मैत्री एकीकडे. मात्र, राज्यपाल आले म्हणजे महाराष्ट्र सरकारच आलं असं मी मानतो. खरं तर नाशिकचं चांगलं क्लायमेट बघून प्रभू श्री रामचंद्र पूर्ण परिवारासह इथं राहिले. माझं तुम्हालाही निमंत्रण आहे. तुम्ही देखील इथे या, असे आवाहन त्यांनी केले.

उत्तर महाराष्ट्राचीही प्रगती व्हावी….

भुजबळ म्हणाले की, मध्यंतरी कोरोना आला. आपण साऱ्यांनी तोंडाला पट्ट्या लावल्या, पण त्यामुळे कोणाचे पैसे द्यायचे असतील, तर पळून जाता येत होतं. मास्कमुळे कोण आलं, कोण गेलं कोण भेटलं कळतच नाही. राज्यपालांनी मास्क घातलाय, असे म्हणतात कोश्यारी यांनी तात्काळ मास्क काढला. यावेळी भुजबळांनी पश्चिम महाराष्ट्राची नाही, तर उत्तर महाराष्ट्राची देखील प्रगती झाली पाहिजे, अशी आशा व्यक्त केली.

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.