Bhandara Corona | भंडारा जिल्हा ग्रीन झोनमधून पुन्हा ऑरेंज झोनमध्ये, पुण्याहून आलेल्या वृद्ध दाम्पत्याला कोरोना

कोरोना रेड झोन पुण्यावरुन आलेल्या वयोवृद्ध पती-पत्नी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

Bhandara Corona | भंडारा जिल्हा ग्रीन झोनमधून पुन्हा ऑरेंज झोनमध्ये, पुण्याहून आलेल्या वृद्ध दाम्पत्याला कोरोना
Follow us
| Updated on: May 17, 2020 | 5:36 PM

भंडारा : भंडारा जिल्हा कोरोनाच्या ग्रीन झोनमधून पुन्हा ऑरेंज झोनमध्ये (Bhandara Back To Orange Zone ) आला आहे. कोरोना रेड झोन पुण्यावरुन आलेल्या वयोवृद्ध पती-पत्नी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या दाम्पत्याला पुण्याहून खाजगी गाडीत घेऊन येणाऱ्या चालकाला आणि त्याच्या परिवाराला क्वारंटाईन (Bhandara Back To Orange Zone ) करण्यात आलं आहे.

या कोरोनाबाधित दाम्पत्याशी संबधित 29 जणांनाही क्वारंटाईन करण्यात आलं आहे. आतापर्यंत एकूण 3 पॉझिटिव्ह रुग्ण जिल्हयात आढळलेले असून एका रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हयात दोन पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी दिली.

या रुग्णांमध्ये 58 वर्षीय महिला आणि 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. हे पती-पत्नी पुणे येथून 14 मे रोजी भंडाऱ्याला आले होते. त्यानंतर 15 मे रोजी त्यांना क्वारंटाईन करुन तात्काळ त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाला ते कोरोना पाझिटिव्ह आढळले आहेत.

हे कोरोनाबाधित पुण्यातील असल्याने आणि भंडारा येथे येताच लगेच त्यांची वैद्यकीय तपासणी करत रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने ते राहत असलेले क्षेत्र कंटोनमेंट झोन (Bhandara Back To Orange Zone ) जाहीर करण्यात आलेले नाही.

ज्या खाजगी गाडीने ते भंडाराला आले होते, त्या गाडीच्या चालकाला त्याच्या परिवारासह क्वारंटाईन करण्यात आले. तसेच, 29 अति धोक्यातील लोकांनाही क्वारंटाईन करण्यात आले असून या सर्वांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

रेड झोन मधून येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचा धोका असल्याने राष्ट्रीय महामार्गावर कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच, बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींना तात्काळ संस्थात्मक‍ क्वारंटाईन करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या व्यवसाय जसे सुरु आहेत तसेच सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, प्रत्येकाने सोशल डिस्टनसिंग चे पालन करावे, मास्क वापरावे, सॅनिटाइझर करावे.

तसेच ज्या लोकांना होम क्वारंटाईन केले जाते, त्या सर्वांनी त्यांचे पालन करावे आणि घरीच राहावे अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाही करावी. पहिल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या दरम्यान ज्या लोकांना होम क्वारंटाईन केले गेले होते, त्यांचे 14 दिवसाचे होम क्वारंटाईन संपल्याचे त्यांनी (Bhandara Back To Orange Zone ) या वेळेस सांगितले.

संबंधित बातम्या :

Lockdown : हॉटेल व्यवसाय ठप्प, केंद्राकडे आर्थिक मदतीची पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांची मागणी

महाराष्ट्रात कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत वाढ, दोन दिवसात 145 जणांना लागण

Ratnagiri Corona | मुंबईहून आलेल्या चौघांना ‘कोरोना’, रत्नागिरीत कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

Maharashtra Corona Cases | राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 30 हजार पार, दिवसभरात 67 मृत्यू, 1606 नवे रुग्ण

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.