तुम्हीही घरी कुत्रा पाळत असाल तर सावधान…! भंडाऱ्यात घडली खळबळजनक घटना

बहुतांश लोकांच्या घरी कुत्रा, किंवा मांजर पाळली जाते. कुत्रा पाळायला तर अनेकांना आवडतं. तुम्हीही तुमच्या घरी कुत्रा पाळला आहात का ? याचं उत्तर हो असं असेल, तर आजच सावध व्हा.

तुम्हीही घरी कुत्रा पाळत असाल तर सावधान...! भंडाऱ्यात घडली खळबळजनक घटना
Follow us
| Updated on: Jan 05, 2024 | 1:09 PM

रुपेश सपाटे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, भंडारा | 5 जानेवारी 2024 : अनेक लोकांना घरी प्राणी पाळायची सवय असते. बहुतांश लोकांच्या घरी कुत्रा, किंवा मांजर पाळली जाते. कुत्रा पाळायला तर अनेकांना आवडतं. तुम्हीही तुमच्या घरी कुत्रा पाळला आहात का ? याचं उत्तर हो असं असेल, तर आजच सावध व्हा. कारण भंडारा जिल्ह्यात अशी एक खळबळजनक घटना घडली आहे, जी तुमच्या बाबतीतही घडू शकते. त्यामुयळे घरात कुत्रा पाळला असेल तर आजच सावध व्हा आणि योग्य काळजी घ्या. भंडारा जिल्ह्यामध्ये नुकतेच दोन कुत्र्यांनी त्यांच्याच मालकाचे लचके तोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुत्र्यांच्या या हल्ल्यात तो इसम गंभीररित्या जखमी झाला आहे. यामुळे एकच खळबळ माजली असून सर्वत्र दहशतीचं वातावरण आहे.

नेमकं घडलं तरी काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यांतर्गत असलेल्या खडकापूर या गावात हा दुर्दैवी प्रकार घडला. तेथे राहणाऱ्या विलास पडोळे नामक शेतकऱ्याने आपल्या शेतीच्या देखरेखीकरिता दोन कुत्रे पाळले होते. घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे विलास पडोळे हे त्या दोन्ही कुत्र्यांचे पट्टे आपल्या हाताला गुंडाळून त्या दोघांनाही फिरवत होता. दरम्यान अचानक दोन्ही कुत्रे पळण्याचा प्रयत्न करू लागले. तेव्हा पडोळे यांनी त्या दोघांनाही अडवण्याचा, रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या गळ्यातील पट्टे ओढले. मात्र त्यानंतर अचानक त्या दोन्ही कुत्र्यांनी त्यांच्या मालकावर, विलास यांच्यावरच हल्ला चढवला. दोन्ही कुत्र्यांनी पडोळे यांना ठिकठिकाणी चावा घेतला, त्यांचे लचके तोडले. यामुळे विलास पडोळे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना बऱ्याच जखमाही झाल्या, रक्तस्त्रावही झाला. पुढील उपचाराकरिता त्यांना नागपूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

यापूर्वीही  कुत्र्यांनी मालकांवर किंवा इतर लोकांवर हल्ल्या केल्याच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत. पण भंडाऱ्यातील या घटनेने एकच खळबळ माजली आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.