तरुणाने डीजे डॉल्बीवर ठेका धरला, बेभान होऊन डान्स केला, नंतर जे काही समोर आलं ते धक्कादायकच, नेमकं काय घडलं?

डीजे डॉल्बीवर डान्स करण्याची अनेकांची हौस असते. मात्र, भंडारा येथे एका तरुणासोबत घडलेला प्रकार धक्कादायक असून संपूर्ण कुटुंबचं चक्रावलं गेलं आहे.

तरुणाने डीजे डॉल्बीवर ठेका धरला, बेभान होऊन डान्स केला, नंतर जे काही समोर आलं ते धक्कादायकच, नेमकं काय घडलं?
वाढदिवसाच्या पार्टीत डीजेवरुन झालेल्या वादातून मित्राची हत्याImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Apr 21, 2023 | 2:52 PM

भंडारा  : कुठलाही उत्सव किंवा शुभकार्य असेल तर डीजे डॉल्बीवर ठेका धरायची अनेकांची हौस असते. त्यात लग्नकार्य, मिरवणूक असेल तर अक्षरशः बेभान होऊन नाचतात. असंच बेभान होऊन डीजे डॉल्बीवर ठेका धरणं तरुणाला चांगलंच महागात पडले आहे. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय हे गाणं काही वर्षांपूर्वी तूफान गाजलं होतं. मात्र हाच आवाज वाढवून बेभान होऊण डान्स करणं भंडारा येथील एका तरुणाच्या जिवावर बेतलं आहे. खरंतर डीजे समोर डान्स करण्याचा मोह अनेकांना आवारात नाही. मात्र, याच काळात मर्यादेपेक्षा आवाज जास्त झाल्यास काय होऊ शकते त्यासाठी भंडारा येथील तरुणासोबत घडलेला प्रकार धडा घेण्यासारखा आहे.

भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द येथील नितीन लील्हारे या तरुणासोबत हा प्रकार घडला आहे. नितीनच्या काकाच्या मुलाचं लग्न होतं. लग्न म्हंटलं की डीजे डॉल्बी आणि डान्स हे समीकरणचं असतं. नवरदेवाची वरात निघाली आणि त्यानंतर सर्व वऱ्हाडी मंडळी ठेका धरून नाचत होती.

मात्र, असे असतांना काकाच्या मुलाच्या लग्नात नितीन मागे राहिला नाही. त्यानेही ठेका धरला. संपूर्ण वऱ्हाडी मंडळी थकली पण नितीन काही थकला नाही. अखेरच्या क्षणापर्यंत नितीनचा डान्स सुरूच होता. मात्र, सायंकाळ नंतर नितीनच्या कानात सारखा डीजेचा आवाज घुमत होता.

हे सुद्धा वाचा

इतकच काय रात्रभर झोपेत असतांना डीजेचा आवाज कानात घुमत होता. मात्र, हा त्रास काही एक दोन दिवस कमी झालाच नाही. नितीनला वाटले अजून चार पाच दिवस वाट बघू पण आठ दिवस उलटले तरी देखील आवाज काही कमी झाला नाही. शेवटी नितीनने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे ठरविले.

डॉक्टरांनी तपासणी केली. त्यामध्ये एका कानाला पूर्णतः आवाजच येत नव्हता. तर एका कानाला थोडाफार आवाज येत होता. त्यानंतर नितीनला बहिरेपणा आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डीजेवर डान्स करणं नितीनला चांगलेच महागात पडले आहे. कायमस्वरूपी नितीनला बहिरेपणा आला आहे.

ही संपूर्ण घटना डीजेच्या आवाजामुळे घडली आहे. नितीनला डीजेचा नाद कायम स्वरूपी बहिरेपणा देऊन गेला आहे. त्यामुळे नितीनला आलेला अनुभव सांगत त्याने डीजे समोर कुणीही नाचू नये असे आवाहन केले आहे. नितीनला आता पश्चाताप करण्यापलिकडे हाती काहीही उरलेले नाहीत.

140 डेसिबल पेक्षा डीजेचा आवाज अधिक असतो. त्यामुळे बहिरेपणा येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे डीजेचा आवाज जोरजोरात वाजत असल्याने ह्या डीजेमुळे लहान मुलांना, वयोवृद्ध नागरीकांना हृदयविकाराचा झटका सुद्धा येऊ शकतो.

यापूर्वी असे प्रकार घडले आहे. शहरात याकडे लक्ष दिले जात असले तरी ग्रामीण भागात नियमांचे उल्लंघन करून डीजेचा आवाज वाढवला जातो. मात्र, तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असते त्यामुळे अशा घटना घडत असल्याचे तज्ज्ञ मत व्यक्त करत आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.